अहमदनगर - मातोश्री उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आलमगीर या ठिकाणी जिल्हयातील उर्दु माध्यमिक मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी 'ऑनालइन अध्यापन कसे करावे' यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल हेडमास्टर्स असोसिएशन व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासार शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित सर, अलफलाह एज्युकेशन अँण्ड वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख कार्यवाह डॉ. अब्दुस सलाम सर, अहमदनगर जिल्हा उर्दु माध्यमिक असोसिएशन चे अध्यक्ष मुख्तार मुल्ला सर, सचिव जाकिर सय्यद सर, माजी अध्यक्ष रियाज सर, मातोश्री उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक जमीर शेख सर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उर्दु हायस्कूलचे मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना असोसिएशन चे सचिव जाकिर सय्यद सरांनी नवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करण्याची व त्याच्या महत्वावर भर दिला. माजी अध्यक्ष रियाजसर म्हणाले की बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून घेतले पाहिजे. इतर क्षेत्रात डोळेझाक झाली तर त्याची क्षती भरुन निघू शकते. पण शिक्षकाचे थोडेसे दुर्लक्ष संपूर्ण पिढीचे नुकसान करू शकते. त्याची भरपाई होणार नाही.
पंडित सर म्हणाले की, असे नियोजन सर्व माध्यमांच्य शिक्षकांसाठी होणे गरजेचे आहे. शिक्षणाधिका
री कडूस म्हणाले की अश्या प्रकारे शिक्षकांसाठी कार्यशाळेचे जिल्हास्तरावर आयोजन गरजेचे आहे. उर्दु मुख्याध्यापक असोसिएशनने आयोजन करून आघाडी घेतली आहे यातून शिक्षकांची विद्यार्थांच्या प्रती असलेली तळमळ लक्षात येते. येथून प्रशिक्षण घेऊन त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा प्रशिक्षणातून काय साध्य झाले याचाही पाठपुरावा करण्यात यावा.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी संस्थेने संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ. अलहाज शेख अब्दुस सलाम सर, मुख्याध्यापक जमीर सर, एजाज सर, पटेल सर, जाकिर सर, सांगलीकर सर, शहनाज मॅडम, खलील सर, रफीकसर, नजमुस्सहेर मॅडम, अतीक सर, युनूस सर, रज्जाक सर, रियाज सर, फारूक सर, अफजल सर, सय्यद सर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन निशात मॅडम यांनी केले.

