हरित नगर अंतर्गत भव्य वृक्षभेट मोहीम

 



अहमदनगर - अनंत चतुर्दशीच्या दिवशी केडगावातील महापालिकेच्या विसर्जन कुंडात गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश मंडळांना व  गणेश भक्तांना केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने वृक्षभेट देण्यात आली. सदर वृक्ष नागरिकांनी आपल्या परिसरात रोपण केले. मंचच्या वतीने प्रत्येक कुंडावर वृक्षभेट देण्यात आले. "कुठलीही मोहीम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही या मोहिमेला नागरिकांनी दिलेला उस्फुर्त प्रतिसाद  पाहता लवकरच हरित केडगाव चे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल असे उद्गार मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी काढले. व "जल प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणाऱ्या नागरिकांचे कोतवाली पोलिस चौकी अहमदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी कौतुक केले.
 
मनपा अहमदनगर अधिकारी कर्मचारी , कोतवालीचे अधिकारी पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी आणि मंचच्या सदस्य पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी झाली व अशा भावना मंचचे खजिनदार प्रवीण पाटसकर यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी पोलीस नाईक भेटे, टिपरे, दानी,खोकले, बोरुडे, शिंदे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते, पवार होमगार्ड दीपक सातपुते, वैभव लोखंडे, सुनील नांगरे, मंदार सटाणकर.
 
मनपाचे मुकादम बाबासाहेब जाधव,विजय कोतकर, अशोक गुंड , प्रकाश साठे तसेच मनपा कर्मचारी लखन शिंदे, भरत कांबळे, बाळू बोडके, जालिंदर बोरगे, सोनू बारसे, संतोष बुलाखे,सर्जेराव पवार, बाळू शिंदे, श्रीहरी बुलाखे,अरुण धोत्रे, राजू मेढे, कुणाल नरवाला, सतीश कांबळे, बाबासाहेब अरुण , आकाश साळवे, प्रशांत शिंदे, मच्छिंद्र गायकवाड, विकास धीवर, भाऊ कांबळे, रोहित शिंदे, कानिफनाथ कांबळे, रोहन चावरे, अंकेत शिंदे, जालिंदर शिंदे, विशाल राजपूत, सुदाम सातपुते मंचचे पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रकाश बिडकर, सायबर सेलचे अध्यक्ष अतुल ढवळे, जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव कदम. मंचचे सद्दाम शेख जनार्दन भोजने, अमोल शिरसाठ, अमोल रणदिवे, उस्मान मन्यार, मेजर बोरकर, गणपत वाघमोडे आदींनी श्रम घेतले.




Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!