मराठीचा गोडवा असलेले अन्सार चाचा

 


मराठीचा गोडवा असलेले अन्सार चाचा

आपण महाराष्ट्रात राहणारे लोकं आपल्या व्यवहारीक भाषा ही मराठीच आहे परंतू आधुनिक युगात मी कसे संभाषण करु मला संभाषण कौशल्य शिकावे लागेल आदि मनात प्रश्‍न असतात परंतू असेच एक जिवंत उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवत संगमनेर पासून जवळच असलेले पता- संगमनेर-कोपरगांव रोड, समनापूर, संगमनेर, 422605 नसीब वडापाव म्हणजेच अन्सार चाचा प्रसिध्द होताना दिसत आहे.

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर !.... ग्राहकांना आकर्षित करणारे अन्सार चाचा - चाचांचे काही ग्राहकांबरोबर केलेले संभाषण -

‘‘एक पिता...की दोन पिता’’

‘‘चटक्याला समुद्राचा झटका मार’’

‘‘प्रचंड वेगाने नेता मध्ये कार्यक्रम राबवून टाका’’

‘‘खाता की नेता पाच दे दादांना प्रेमाने’’

‘‘आपण गिर्‍हाईकाच्या जीवावरच माकडावाणी उड्या मारतोय भाऊ’’

‘‘माय बाप 3 पॅकेट कर कायदेशीर’’

‘‘त्या अक्काला विचार काय हवे आहे ती तीन महिन्यांपासून वाट पाहते आहे’’

असे काही संभाषण बोलून काका ग्राहकांचे मन जिंकत आहे. चाचाचे वडापाव खाण्यातही चविष्ठ आहे. चाचा ग्राहकांबरोब गोड संभाषण करतात त्यामुळे ते आज पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे व्हिडीओ सोशल मिडायावर व्हायरल होतांना दिसून येत आहे. सोशल मिडियामधून चाचांची धुम लोकांमध्ये प्रसिध्द होतांना दिसून येते त्यातीलच काही कमेंट .....

गोड बोलणार्‍यांची माती पण विकली जाते. मराठी मुस्लिम संभाषण कौशल्य कसा असावा हे त्यांच्या शब्दांतून दिसून येतो,  काका! मला तुमची व्यवसाय करण्याची पद्धत खुपच आवडली.... प्रत्येक व्यवसायिकाणे गिर्‍हाईकाला देव समजले पाहीजे... मुस्लिम व्यक्ती किती सफाईदारपणे शुद्ध मराठी बोलतो वा...! काकांकडे पाहून बिझनेस मॅनेजमेंट कोर्स करायची गरजच वाटत नाही... ईश्वर काकांना खूप मोठं आयुष्य देवो.... 

मातीच सोन करण म्हणजे काय ते ह्या चाचा कडून शिकावे , एवढं बोलून पैशाचा चोख हिशोब ठेवायचा म्हणजे सोप्प नाही, खूप लहरप

अशी गोड बोलणारी माणस जगात सगळी कडे असतील तर जग किती सुंदर होईल

लोकहो, चाचा कड बघून वाटतंय का की आपण हिंदु मुस्लिम करतो ते करण्याची काही गरज नाही?

राजकीय पक्षांना बळी पडू नका.

चाचा चे बोलने खूप छान आहे .सलाम चाचा

महा प्रचंड वेग

उहरलहर बोलण्याची style एक नंबर... आपल्या मराठी लोकाना उद्योगात गोड बोलायला पाहिजे..

चाचांच्या अनोख्या शैलीमुळे ,

आपण सगळे इतने खपा खप घेता ,

की, चाचाको पैसा लेणे को नहीं सुधरता.....

भाषा काकांची... आपलं माणुस असलेल्या सारख वाटत

सामाजिक समभाव, सहज नाही कळत प्रत्येकाला पण? आपल्या सारखी माणसं हया समाज्यात आणि देशात वावरून जर आपला  देश आपण योग्यरित्या संभाळत असेल तर. मला वाटतं कोणालाच प्रॉब्लेम नको. जय हिंद जय भारत.

मराठी खूपच अप्रतिम आहे...

कोणताही उद्योग करताना तेथील स्थानिक भाषा येन आणि वाणी तितकीच शुद्ध आणि गोड सुंदर असणं याच महत्व काय हे या चाचा न कडून शिकायला मिळत आहे ...खरच सुंदर आणि प्रभावित करण

स्वभावाने चांगला माणूस दिसतोय अल्ला तुमच्या कामाला गती देवो.

खाऊ दे प्रेमाने ॥ ग्राहकाला नाराज करू नको ॥ अजून दे ॥ अजून देऊ दादा ॥ ग्राहकाला नाराज नको करू ॥ आपण ग्राहकाच्या जीववरूनच माकडा सारखो उड्या मारतो भाऊ ॥

व्यवसाय कसा करावा ? हे ह्या चाचाकडुन शिका.. ह्यांच्या बोलण्यात खुप प्रेमळपणा आहे. 

धन्यवाद चाचा तुमच्याकडून व्यवसाय करण्यासाठी खुप छान शिकायला मिळाले.

बोलणार्‍याची माती पण विकते, न बोलणार्‍याचे सोने पण विकले जात नाही याचे उत्तम उदाहरण. तोंडात गोडवा असेल तर लोक तुमच्याकडे येणारच.

एवढी प्रचंड प्रेमळ भाषा एकूण खरच खूप आनंद वाटतो कारण आजकाल कोणीही एवढं प्रेमाने स्वतःच्या मुलासोबत सुधा बोलत नाही.

हीच आहे भारतीय संस्कृती पण राजकारणी लोक फोडा आणि राज्य करा हीच निती अवलंबून आंम्हाला एकमेकांपासून वेगळ करतात.

अनुभवाच्या विद्यापीठातील व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान ! कुठलेही एम बी ए झक मारेल चाचाच्या पुढे !

मराठी माणूस आपला  कधीही गोड बोलत नाही त्या चाया मुळच आपल्या धंदा वर माशां मारायला लागतात आणि गोड बोलून धंदा कसा करावा हे अनसारी चाचा ने दाखवून दिलय.

मजेचा विषय नाही, गोड बोलून धंदा कसा करावा हे शिका, बापाच्या जीवावर मजा मारणारे पोट्टे!!!! धंदा करा नोकरी नको. 

नोकरी म्हणजे बंधन...

रोज सकाळ चा नाश्ता अश्या व्यक्ती जवळ केला..तर दिवस मस्त मजेत जाईल....वाह..काय भारी बोलतात मामा..कडक

चिंध्या पांघरूण सोने विकावयास बसलो, गि-हाईक येता येईना. 

आणि सोने पांघरूण चिंध्या विकावयास बसलो गि-हाईक तुटतां तुटना! 

म्हणजेच काय विकत आहात हे महत्त्वाचे नाही तर कसे विकत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे.

पहिली म्हण सिद्ध केली चाचा तुम्ही.

बोलनार्‍याच्या  एरंड्या विकल्या जातील, न बोलणार्‍याचे गहू पण विकले जाणार नाहीत.

खरंच लेकाहो मराठी मुसलमान वेगळेच असतात इतर राज्यांच्या मुस्लिमांच्या तुलनेत , आमच्या गावात होता एक एसटी महामंडळ , खूप नाव कमावलं त्या भयी ने

मी एकदा चाचा कडील वडे पावची टेस्ट घेतली आहे... सो काहीही असो...पण एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते... नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील लोकांची मराठी भाषा खूप म्हणजे खूप सुरेख आहे...

‘नसीब वड्याच्या’ दुकानात आपली मेहनत आजमावत अन्सार इनामदार चाचा अगदी हसर्‍या चेहर्‍यानेे, या मायबाप, असं सरकारी नियमाने लायनीत या... प्रचंड वेगाने... म्हणत आपल्यात असलेल्या माणूसकी व आदरपूर्वक ग्राहकांचा पुरेपूर सन्मान करत शिस्त पाळण्याचे व शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात. आपण केव्हा ही बघितल्यावर वड्या समोरची खवय्यांची लांबलचक रांग तुमच्यातल्या वडाप्रेमीला चुंबकासारखी खेचून घेते.

लहानपणापासून अनेक व्यवसाय करत करत, अखेर माणसाची मुलभूत गरज म्हणजे भूकेमुळे स्थिरावले आणि त्यातच त्यांनी मेहनतीने आपले नसीब उजाडलं. परंतू मेहनत तर सर्वच करतात आणि नशीब हि सगळ्यांकडे असतेच वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवून ते हातोहात विकून इतर सर्वही प्रसिध्द झाले असते परंतू चाचांचा विचारले असता त्यांनी जे सांगितले ते.... बेटा छोटा इगो बोहोत बडी चीझ है... आपल्यातले स्वत:चे छोटे छोटे इगो (गर्व अहंकार) सांभाळत बसायला जिंदगी बोहोत छोटी है. वडे सगळीकडे मिळतात, कमी किंमतीत मिळतात, परंतू आकर्षित करून घ्यायला चाचांचे दोन शब्द आपलेसे करुन घेण्यास कारणीभूत ठरतात. 

सध्याच्या आधुनिक युगात ग्राहक वृध्दी व प्रसिध्दी मिळविण्यासाठी वेगवेगळी जाहिरात बाजी व महागडी कॅम्पेन्स केली जाते परंतू चाचा मराठी बाणा व त्यातून लोकांना आदरपूर्वक आपलंस करुन घेणारे चाचा, एकदा वडा विकणेसाठी आले की ते अशा असंख्य चाहते रांगेत उभे असणार्‍या मायबाप ग्राहकांना चाचा आपल्या खुमासदार विनोदी  शैलीमध्ये व्यग्र ठेवतात. चविष्ट वडे, ‘समुद्राचा झटका मारलेला चटका’ पाण्याची बॉटल आणि मुख्यतः ह्या सगळ्यांच्या बेस असलेली महाप्रचंड नम्रता आणि भाषेतील गोडवा ह्या भांडवलाच्या जोरावर अन्सार इनामदार चाचा गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राहकांचे क्षुधाशमन अविरतपणे करतायेत. 

अन्सार इनामदार चाचा अनेक वर्षांपासून देत असलेली ही सेवा, कोणी नेटकर्‍यांनी शूट केली आणि सोशल मीडियावर चाचांना एक वलय प्राप्त झाले. ते शेअरही झाले पण तरीही ह्या प्रसिद्धीने हुरळून न जाता चाचा बुद्धी आणि वाणीवरची पकड शाबूत ठेवतात. प्रेमाने वडा कसा झालायं चविला हेही विचारतात.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. thanks viewers, मराठी ही आमची ओळख आहे, धन्यवाद साहेब।

    ReplyDelete

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!