प्रा. शेख फातेमा इब्राहिम व प्रा. शेख अकिला मेहमुद यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मान

 

 

अरुणा आसिफअली महिला शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्यावतीने मासुमियाँ डि.एड्. कॉलेजच्या प्राध्यापिका शेख फातेमा इब्राहिम व शेख अकिला मेहमुद यांचा सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर, सलिमखान पठाण, मंडळाच्या अध्यक्षा शेख फरिदा भाभी, अफसाना भाभी, फरहाना नाज, नौशाद सय्यद, अफसाना बाजी, यास्मिन सय्यद, जमिर शेख, आबीद दुलेखान आदि.

नगर - आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याने प्रत्येक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. परंतु जुन्या काळी महिलांवर अनेक बंधने होती. अशा परिस्थितीत महिलांनी शिकून आपल्या कार्यकर्तुत्वाने आपले अस्तित्व सिद्ध केले. शिक्षकी पेशा म्हणजे समजा घडविणारा असल्याने लहान बालकांना घडविण्याचे अवघड काम आहे. शिक्षकांवर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. आज सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका यांनी प्रदीर्घ सेवा देऊन आज निवृत्त होत आहेत. परंतु निवृत्ती नंतरही त्या समाजिक कार्यात योगदान देत राहतील, असा विश्वास अरुणा आसिफअली महिला शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरिदाभाभी यांनी केले.


अरुणा आसिफअली महिला शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्यावतीने मासुमियाँ डि.एड्. कॉलेजच्या प्राध्यापिका शेख फातेमा इब्राहिम व शेख अकिला मेहमुद यांचा सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर, शिक्षक बँकेचे चेअरमन सलिमखान पठाण, मंडळाच्या अध्यक्षा शेख फरिदा भाभी, संचालिका अफसाना भाभी, मौलाना आझादच्या मुख्याध्यापिका फरहाना नाज, सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक नौशाद सय्यद, सर सय्यद अहेमदखान उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अफसाना बाजी, प्राचार्या यास्मिन सय्यद, मातोश्री उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक जमिर शेख, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान आदि उपस्थित होते. 


याप्रसंगी प्रा.डॉ.सलाम सर, सलिमखान पठाण यांनीही सेवानिवृत्त शिक्षिकांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
सन्मानला उत्तर देतांना शेख फातेमा व शेख अकिला म्हणाल्या, शिक्षण हे समाजातील तळागाळापर्यंत पोहचावे, शाळांमधून चांगले विद्यार्थी घडवावे. यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे संचालकांनी केलेले सहकार्य आणि शिक्षक सहकार्यांच्या साथीने प्रदीर्घ कारकिर्द पूर्ण करण्यात आली. यापुढील काळातही शिक्षण क्षेत्रातच कार्यरत राहू, असे सांगून सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान निशात सोहेल यांनी केले तर आभार जमिर शेख यांनी मानले. कार्यक्रमास मंडळाचे सदस्या व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!