एकदंत महिला मंडळाच्या वतीने बोरुडे यांचा सत्कार

 

नगर - प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे माझ्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने आपली सभापतीपती निवड झाली आहे. या पदाच्यामाध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. महापालिकेच्यावतीनेराबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीचे सभापती सौ.पुष्पाताई बोरुडे यांनी केले. 

एकदंत महिला मंडळ व एकदंत गणेश मंदिराच्या वतीने नगरसेविका सौ.पुष्पाताई अनिल बोरुडे यांची अहमदनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होत्या.

यावेळी सौ.सुरेखा कोडम, सौ.स्वाती गाजेंगी, विनोदा बेत्ती, सौ.राधा सिरसुल, वैशाली इराबत्तीन,  अनुपमा इराबत्तीन, कमल गाजेंगी,  मीना बुरगुल, रेणुका सिरसुल, सपना सुंकी, अश्विनी नागुल,रुपाली इराबत्तीन, कीर्ती इराबत्तीन, अन्नपूर्णा गाजेंगी आदींसह  महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

पुढे बोलताना सौ. बोरुडे म्हणाल्या की, कुठल्या ही पदाची अपेक्षा न काम केल्यामुळे हे पद मला मिळाले असून हा विजय आहे तो फक्त माझ्या विकास कामांचा. एकदंत गणेश मंडळाच्या हा सत्कार म्हणजे माझ्या माहेर ने केलेला कौतुक आहे. मंडळ हे नेहमी माझ्या प्रत्येक सुख, दुःखात सहभागी होत असते, एकदंत गणेश मंडळाचे कार्य म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

प्रास्ताविकात सौ.सुरेखा कोडम म्हणाल्या की चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यामुळे प्रभगाचा विकास होतो. आणि विकास करणाऱ्या लोकपरतिनिधींची विविध पदांवर निवड केली जाते. नगरसेविका पुष्पाताई बोरुडे यांची निवड म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामांची पावती आहे, म्हणूनच एकदंत महिला मंडळ आणि एकदंत गणेश मंदिराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे सांगून महिला मंडळ व मंदिराच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती गाजेंगी यांनी केले तर आभार विनोदा बेत्ती यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!