अहमदनगर : राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ महिला बालकल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आणि 'डोंगरगण' ग्रामपंचायत, यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय पोषण महिना' साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने डोंगरगणा येथे पौष्टिक आहार या अंतर्गत ३४ गर्भवती महिलांसाठी चिक्कीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डोंगरगण गावच्या सरपंच श्रीमती वैशाली सर्जेराव मते या होत्या, तर अध्यक्षस्थानी राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. माधव
सरोदे हे होते. याप्रसंगी श्रीमती मते यांनी आपल्या भाषणात गर्भवती महिलांच्या पोषणाबाबत जागृत होणे बाबतची आवश्यकता व्यक्त करून महिलांसाठी सकस आहारविषयी माहिती दिली व त्यांच्यात मातृत्व संवेदना जागृत केल्या.
अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आरोग्य संपदा व निसर्गप्रेम जोपासण्याचे आवाहन करून युवती व महिलांनी आपली बौद्धिक पातळी उंचावण्यासाठी नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होणे बाबत इच्छा व्यक्त केली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याउपक्रमात डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मते, ग्रामसेवक सौदागर, उपप्राचार्य प्रा.नासीर सय्यद, प्रा. सतिश शिर्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम कानडे
यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी ठुबे यांनी केले तर आभार डॉ. गणेश विधाटे यांनी मानले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुश्री भागवत, डॉ. एजाज शेख, डॉ. शंकर केकडे, डॉ. बंडेराव तन्हाळ, डॉ. सतीश सायकर, प्रा.विलास येलके, डॉ. मुबारक शेख, प्रा. अनिल जाधव, प्रा. अजय जाधव, प्रा. दशरथ शेळके, श्री नितीन राठोड, श्री बापू वढणे, श्री साळवे, श्री संतोष चव्हाण इत्यादींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य शाखेतूनबारावीला प्रथम आलेली विद्यार्थिनी कु भैरवी भुतकर हीचा सत्कार करण्यात आला.

