अहमदनगर - महाराष्ट्र राज्य व्हाॅलीबाॅल संघटनेच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल पंच परीक्षा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.28,29 व 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत आॅनलाईन कार्यशाळा व पंच परीक्षा संपन्न होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटनेचे सचिव एल.बी.म्हस्के यांनी दिली.
अहमदनगर
जिल्हयातील क्रीडा शिक्षक, क्रीडा संचालक, मार्गदर्शक व खेळाडूंसाठी या
परीक्षेचे आॅनलाईन आयोजन करण्यात आले आहे. झुमच्या माध्यमातून 28 व 29
सप्टेंबर 2021 रोजी कार्यशाळा संपन्न् होणार असून या कार्यशाळेमध्ये
आंतरराप्ट्रीय दर्जाचे पंच व क्रीडा मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच 30 सप्टेंबर 2021 रोजी आॅनलाईन पध्दतीने पंच परीक्षा संपन्न् होणार
आहे. तसेच दि.3 आॅक्टोंबर 2021 रोजी यशस्वी पंचाचे प्रॅक्टीकल संपन्न्
होवून त्याच दिवशी त्यांना पंच परीक्षा व कार्यशाळा संपन्न् केल्याचे
प्रमाणपत्र, व्हिसल व टिशर्ट वितरीत देण्यात प्रदान करण्यात येणार आहे.
तरी
जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व खेळाडूंनी यामध्ये सहभाग
घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष माजी
खासदार प्रसादराव तनपुरे, उपाध्यक्ष प्रा.रमेश मोरगावकर, शैलेश गवळी,
खजिनदार प्रा.संजय पाटील, सहसचिव प्रा.बबनराव झावरे, व संघटनेच्या सर्व
पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
