राहुरी - महावितरणच्या
राहुरी शाखा कार्यालयाचे स्वमालकीच्या आधुनिकीकरण केलेल्या वास्तूत
स्थानांतरण झाले त्यामुळे या माध्यमातून अशीच उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवा
मिळावी असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे
यांनी केले.
महावितरणच्या
राहुरीउपविभाग अंतर्गत असलेल्या बसडेपो समोर असलेल्या राहुरी शाखा
कार्यालयाचे राहुरी खुर्दच्या पोल फॅक्टरी परिसरात आधुनिकीकरण केलेल्या
इमारतीत स्थानांतरण करण्यात आले. त्याचे फीत कापून ऊर्जा राज्यमंत्री ना.
प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते आज शनिवारी सकाळी उदघाटन करण्यात आले, यावेळी
ते बोलत होते.
यावेळी
महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अहमदनगर
मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनिल काकडे, श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी
अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता धीरजकुमार गायकवाड आणि शाखा
अभियंता योगेश गावले यांचेसह कर्मचारी, जनमित्र व ग्राहक उपस्थित
होते.यावेळी ना. तनपुरे यांचे हस्ते एक ग्राहकाचे प्रातिनिधिक स्वरूपात
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यालयाचे
फीत कापून उदघाटन करताना ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे व उपस्थित
मुख्य अभियंता दीपक कुमठेकर,अधिक्षक अभियंता सुनिल काकडे व मान्यवर
