नदी नियंत्रण

नदीचे नियंत्रण म्हणजे नदीचे पुराचे पाणी सर्वकडे पसरु न देता नदीतू वाहत जाणे, याला पूर नियंत्रण असे म्हंटले जाते. पावसाचे पाणी वाहून नेणे नदीचे मुख्य कार्य आणि नदीत येणारा गाळ वाहून नेणे. डोंगराळ प्रदेशातील नद्यांमुळे खडकांची झीज होऊन नदीत गाळ येतो. साधारणपणे डोंगराळ प्रदेशात जमीन कठीण असल्यामुळे तिची झीज होण्यास वेळ लागतो. दोन्ही मजबूत काठांमधून वाहत असल्यामुळे डोंगराळ प्रदेशात नदी नियंत्रणाचा प्रश्न नाही. डोंगराळ प्रदेश सोडून नदी मैदानी प्रदेशात तिच्या नियंत्रणाचा प्रश्न उद्भवतो. मैदानी प्रदेशात नदी, तिनेच वाहून आणलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या प्रदेशातून वाहत असते. मैदानी प्रदेशातील नदी बहुधा नागमोडी वाहत असते. हा नागमोडी प्रवाह तिच्या दोन काठांमधून वाहत असतो. पुराच्या वेळी नदी हे काठ ओलांडून आजूबाजूच्या प्रदेशात पसरते.

पाणी व गाळ वाहून नेणे या नदीच्या कार्यांमुळे नदीचे पात्र व काठ यांच्यावरही नेहमी परिणाम होतो. नदीत वाहून येणारा गाळ तिने वाहून नेलेल्या गाळापेक्षा जास्त असेल, तर नदीच्या त्या भागात तिचे पात्र उचलले जाते. याउलट परिस्थिती असेल, तर नदीचे पात्र खणले जाते. त्याचप्रमाणे नदीच्या नागमोडी वळणाची बहिर्वक्र बाजू नदी खणून वाहून नेते, तर त्याच्या अंतर्वक्र बाजूत गाळ साठत जातो. यामुळे नदीचे काठही स्थिर नसतात.

साधारणपणे नदीचे पात्र व काठ यांच्यातील बदल फार सावकाश होतात. काही नद्या मात्र आपले पात्र फार लवकर बदलतात; उदा., कोसी नदीने आपले पात्र गेल्या 200 वर्षांत सु. 290 किमी. बदलले आहे. गंगेच्या डाव्या तीरावरील उपनद्या (कोसी, घागरा इ.) या बाबतीत कुप्रसिद्ध आहेत. अशा नद्यांचे नियंत्रण करणे फार कठीण असते. नदीच्या पात्रात एखादे बांधकाम केल्यास नदीचा मूळचा समतोल बिघडतो व नदी तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात मूळ बांधकामाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. याबाबतीतही नदीचे नियंत्रण करून बांधकामाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतात.

नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता व पाणी वाहून नेण्याची क्षमता या एकमेकींवर अवलंबून असतात. यांपैकी पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेविषयी बर्‍याच अचूकतेने गणित करता येते आणि त्यासंबंधीची सूत्रे माहीत आहेत; पण गाळ वाहून नेण्याच्या क्षमतेबद्दल अजून पूर्णपणे माहिती नाही व त्यासंबंधी अजून संशोधन चालू आहे. नदीमध्ये या दोन्ही क्रिया सतत चालत असल्यामुळे नदीतील प्रवाहाचे गणित करणे कठीण असते. त्यामुळे नदी नियंत्रणाचे प्रकल्प हाती घेण्यापूर्वी त्यांची प्रतिकृती (मॉडेल) तयार करून तिच्या साहाय्याने संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करावा लागतो व मगच तो प्रकल्प कार्यवाहीत आणता येतो.

नदी पूर नियंत्रणाचे पुढील उद्देश -
* नदीच्या किनार्‍याची धूप थांबवून नदीकाठची सुपीक जमीन वाचविणे.
* नदीच्या किनार्‍याजवळील (इमारती, धक्के इ.)
* नदीतील बांधकाम (पूल वगैरे) यांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे.
* जेथे जलवाहतूक शक्य आहे तेथे नदी पाॐाचह  नौकानयनाला योग्य राहील अशी ठेवणे.
* मार्गदर्शक बांध बांधणे, तीरबांध बांधणे, नदीकाठचे संरक्षण, नदीतील गाळ काढणे.
* नदीची पूर-वाहनक्षमता वाढवून, पुराला कारणीभूत होणारे नदीतील अतिरिक्त पाणी धरणे किंवा तलाव यांत तात्पुरते साठवून.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!