सध्या आपल्या देशात दररोज काही ना काही घडत असते, व आपल्या कानावर अनेक बातम्या येतात त्याच एक नाव येते, इडी चे नाव बातम्यांमध्ये आपण एैकत व बघत असतात, परंतू अचानक हे कसे कोठून आले आपल्या काही समजत नाही, काही अभ्यास करणारे मंडली बोटावर मोजण्या इतकीच असते त्यांना हे सर्व माहित असते. इडी ने आज ..... छापेमारी करण्यात आली किंवा इडी समोर हजर होण्याबाबत समन्स देण्यात आले. करोडो रुपयांची घोटाळा उघडकीस अश्या स्वरुपाच्या न्युज व पेपरच्या माध्यमातून आपल्या समोर येत असते, परंतू इडी काय आहे हे समजत उमजत नाही. त्यामुळे आज आपण इडी विषयी माहिती बघु -
इडी -
अगदी आपल्या भाषेत सांगायचे म्हंटल्यावर इडी (अंबलबजावणी संचालनालय/ Enforcement Directorate) एक शासकीय, अर्थमंत्रालयाचा भाग आहे. शासकीय संस्था असून ही पैशांचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, जास्तीची मालमत्ता आदींवर लक्ष ठेवून चौकशी बसवते. या चौकशीत जर घोटाळा सिध्द झाला किंवा पुरावे मिळाले तर दोषींवर कारवाई केली जाते. त्यामुळे इडीचे नाव कानावर पडताच दोषींना घाम फुटतोच.
कार्यालय -
स्थापना दिनांक 1 मे 1956 साली केली गेली. मुख्य प्रादेशिक ऑफिस राजधानी दिल्लीत असून चेन्नई, चंदीगढ, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी ऑफिस आहे. हैद्राबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, पाटणा, श्रीनगर, डेहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम, जम्मू, भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मुदुरै, नागपूर, इलाहाबाद, रायपूर या शहरांत इडीचे उपकार्यालये आहेत.
विभाग /अधिकारी/परीक्षा/कायदा -
त्यात जे कर्मचारी किंवा अधिकारी असतात ते इंटेलिजन्स व सामर्थ्यवान असतात. यात सेवा देणारे संचालक, प्रादेशिक ऑफिसकडे विशेष संचालक, क्षेत्रीय ऑफिसमध्ये संयुक्त संचालक, उपक्षेत्रीय ऑफिसला उपसंचालक ऑन ड्युटी असतात. इडीला निर्देश आणि मार्गदर्शन सध्या मुख्य अधिकारी हे संजय कुमार मिश्रा हे देतात.
पोलीस, प्राप्तिकर विभाग, कस्टम विभाग, राज्य सेवा विभाग, अश्या विभागामधून विशेष व निवडक व्यक्तींना निवडून काम करण्याची संधी मिळते, कठीण स्पर्धा परीक्षा विविध स्वरुपाच्या देवून, प्रशिक्षण, विविध चाचण्या केल्या जातात व त्यानंतर इडीमध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळतात. पोलिसविभागातील अधिकारी वर्ग आणि महसूल विभागातील अधिकारी व प्रशासकीय सेवा देणारे विभागातील अधिकारी वर्गांचा समावेश होतो. या विभागाची स्थापना या कायद्यांची Foreign Exchange Management Act 1999, Prevention of Money Laundering Act 2002 पुर्णपणे अम्मलबजावणी करणे करीता बनवीली आहे.
कामे -
दुसर्या देशात पैशांचे व्यवहार होतात त्यावर लक्ष देतात, नियमांचे उल्लंघन केल्यावर संबंधीतांवर कायदेअंतर्गत कारवाई केली जाते, भ्रष्टाचार आणि गुन्हे करून जमवलेल्या संपत्तीवर लक्ष ठेवणे त्यावर जप्ती आणून योग्य ती कारवाई करणे, घोटाळ्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही करते, मोठ्या व्यापार्यांनी केलेला भ्रष्टाचार, बँकेचे घेतलेले कर्ज न भरणारे असेच देशात मोठ्या उद्योगपतींनी उद्योग उभे करणे, वाढविणेच्या उद्देशातून बँकेकडून जास्तीचे लोन घेतल व जेव्हा परत करवयाची वेळ आली त्यांनी त्यात पळवाटा काढल्या व इतर देशात जावून लपले. इटी त्यांचा शोध घेवून त्या उद्योगपतींवर कारवाई करते. तसेच क्रिकेट मधील घोटाळे. बँकेची मनी लॉन्ड्रिंग केस व घोटाळे, असो किंवा पीएफआय संघटनेतील घोटाळे यात मोठ्या प्रमाणावर संपत्ती किंवा रकमेचा घोटाळा, भ्रष्टाचार किंवा हेरा फेरी होते. अश्या प्रकरणांवर इडी लक्ष ठेवते व वेळ आली तर लगेच योग्य ती कारवाई करते व आपल्या देशाची आर्थिक नुकसान किंवा संपत्ती परत आणण्याचे कामे करते.
इडी
0
September 29, 2021
