दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अहमदनगर उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण व अहमदनगर उर्दू प्राथ.व माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना नियम पाळत रिमांड होम केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्याना लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तक वाटप व स्वध्याय पुस्तिका वाटप करण्यात आले. प्रसिद्ध "शक्तिमान" सिरीयल फेम अभिनेत्री गीता विश्वास वैष्णवी मॅकडोनाल यांनी व्हिडिओ द्वारे दिव्यांग विद्यार्थ्याना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, तर अमेरिकेतून स्पेशल एज्युकेटर एलेन वेबर यांनी दिव्यांग विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यूनुसभाई तांबटकर चेअरमन नागोरी मुस्लिम मिसगर ट्रस्ट,यांनी दिव्यांगाना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन दिले पाहिजे व त्यांना समान संधी दिली पाहिजे,असे मत व्यक्त केले.समाजाने दिव्यांगाना सदभावणेने पाहायला हवं. त्यानं स्विकरायाल हवं अस मत प्रशासनाधिकारी सुभाष पवार यांनी मांडले. तसेच विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वध्याय पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला यूनुस तांबटकर, चेअरमन नागोरी मुस्लिम मिसगर ट्रस्ट ,प्रशासनाधिकारी सुभाष पवार,पर्यवेक्षक जुबेर पठाण, संस्थेचे सेक्रेटरी इम्रान शफी अहमद शेख, खजिनदार इम्रान जमीर खान, विश्वस्त फरहान खालिद खान आणि नविद आरिफ तांबटकर, नंदेश शिंदे सर, समाजेवक, विशेष शिक्षक उमेश शिंदे, मुख्याध्यापिका नजमुस्सहर बाजी, मुख्याध्यापक इलियास सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.
आसिफ सर यांनी सूत्रसंचालन केले, उमेश शिंदे यांनी प्रस्तावना केली .

