अक्षरांना सुरांच्या माध्यमातून ओळख देण्यात आशा भोसले माहीर आहे : शिवकुमार

अक्षरांना सुरांच्या माध्यमातून ओळख देण्यात आशा भोसले माहीर आहे : शिवकुमार
गाता रहे मेरा दिल ग्रुपच्या वतीने प्रसिद्ध जयेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या गायलेल्या गाण्याची महेफील आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी चारुता शिवकुमार, गुलशन धाराणी, दीपा भालेराव, नीता माने, सुनिल भंडारी, सुनील हळगावकर, दिनेश मंजरतकर, विकास खरात, शौकत विराणी, युनुस तांबटकर, नादिर खान, संजय माळवदे, किरण उजागरे, रामन्ना सर आदि.

नगर : प्रत्येक गायकाने सिनेमा जगतात आपल्या आवाजाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच प्रमाणे आपल्या सुरांच्या माध्यमातून अक्षरांना एक वेगळी ओळख देण्यात सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले माहेर आहे. असे प्रतिपादन संगीतप्रेमी चारुता शिवकुमार यांनी केले. 

गाता रहे मेरा दिल ग्रुपच्या वतीने गायिका आशा भोसले यांच्या 88 व्या जन्मदिना निमित्त रहमत सुलतान सभागृह येथे आशा भोसले यांनी गायलेली गीतांची "एक मै और एक तू" या मैफिलीचे आयोजन कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले होते. व या महेफीलीचे ऑनलाइन प्रसारणही करण्यात आले. 

यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या मैफिलीत गुलशन धारणी, दीपा भालेराव, नीता माने, यांनी आशा भोसले यांची गीते सादर केली. तर द्वगीत साठी त्यांना अमीन धाराणी, सुनील भंडारी, सुनिल हळगावकर, दिनेश मंजरतकर, विकास खरात यांनी त्यांना सहकार्य केले.

या महेफील मध्ये ये राते ये मौसम नदी का किनारा,  रात के हम सफर, प्यार जिंदगी है , तेरे इश्क का मुझ पर हुआ, तुमसे मिलकर ऐसा लगा तुमसे मिलकर, जानेमन जानेमन तेरे दो नयन, अशे आशा जींचे नावाजलेली अनेक गीते सादर करण्यात आली. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना चारुता शिवकुमार यांनी आशा भोसले यांच्या जीवनातील अनेक बाबींचा उलगडा करताना रसिकांना कार्यक्रमात बांधून ठेवले. ऑनलाइन साठी टेक्निकल बाबी साहिल धाराणी यांनी उत्तम रित्या पार पाडले. कार्यक्रमात संगीत प्रेमींनी करोना चे नियम पाळत हजेरी लावली. शेवटी अमीन धारणी यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!