नगर- अल करम सोशल & एज्युकेशन सोसायटीच्या अल करम हॉस्पिटल तर्फे पैगंबर जयंती निमित्त मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत मोफत ओपीडी व सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहे.
तर प्रसूती व सिजर प्रसुती 50 टक्के सवलतीत केली जातील. त्यासाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सोमवार18 ते बुधवार 20 ऑक्टोबर पर्यंत करणाऱ्यांना ही सवलत मिळणार आहे.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अल करम हॉस्पिटल इं गळे मेडिकल जवळ, रविराज आर्केड,किंग्जगेट रोड, अहमदनगर येथे किंवा या 9860708016 नंबर वर संपर्क करावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
