नगर - कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबईत अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये नगरमधील प्रगत कला महाविद्यालयातील फौंडेशन (मुलभुत अभ्यासक्रम) यामध्ये अनिकेत साठेे प्रथम, एटीडी (आर्ट टिचर डिप्लोमा) प्रथम वर्षामधून विद्युलता मगर पाटील, तर एटीडी द्वितीय वर्षात रक्षंदा काथवटे प्रथम आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा.महावीर सोनटक्के, प्रा.संजय काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे सचिव अॅंड.विनायक पंडित, प्राचार्य नुरील भोसले आदिंनी अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त बॅसिल कालसेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संस्थापक त्रिमूर्ती रघुनाथ बाळकृष्ण केळकर पुरस्कार, सी.एम. हणबरहट्टी पुरस्कार व रेव्ह.बिशप ल्युथट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रगत कलाचे माजी विद्यार्थी
शिल्पकार प्रसाद हडतगुणे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन
शिल्पकलेचे प्रात्याक्षित सादर केले. नाशिक डायोसेसन कौन्सिल
पीटीआरटीटू या संस्थेच्या अंतर्गत 1966 पासून कला ज्ञानदानाचे अभ्यासक्रम
प्रगत कला महाविद्यालयातून सुरु आहेत. अनेक माजी विद्यार्थी नवीन
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनात्मक उपक्रम राबवत असतात. यामुळे
विद्यार्थ्यांना खूप शिकण्यास मिळत आहे. पुढील वर्षांपासून शिल्पकलेचा
अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु करण्यास महाविद्यालयास शासनाची मान्यता
मिळाविण्या साठी संस्था प्रयत्नशील असल्याचे प्राचार्य नुरील भोसले यांनी
सांगितले.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबईत अंतर्गत घेण्यात आलेल्या
परिक्षेतील यशस्वी अनिकेत साठेे, विद्युलता मगर पाटील, रक्षंदा काथवटे
यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.महावीर सोनटक्के, प्रा.संजय काळे
संस्थेचे सचिव अॅड.विनायक पंडित, विश्वस्त बॅसिल कालसेकर, प्राचार्य
नुरील भोसले आदि.
