नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या वर्धापनदिन व गांधी जयंतीनिमित्त मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

नगर-मागील दोन वर्षांमध्ये कोविडच्या आजारामुळे संपूर्ण जगाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात मध्यम वर्गीयांची तर मोठ्या प्रमाणात अडचण झालेली असून अशा वेळी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली पाहिजे.जे या काळा मध्ये समाजासाठी वरदानच ठरेल. असे प्रतिपादन नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे चेअरमन युनुस तांबटकर यांनी केले.


नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट च्या वर्धापण दिन व महात्मा गांधी जयंती निमित्त मिसगर डायग्नोस्टिक सेंटर येथे आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी व 50 टक्के सवलतीत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी काॅ.बहिरनाथ वाकळे, काॅ.डाॅ.महेबुब सैय्यद,संजय झिंजे,आरिफ सैय्यद, डॉ.परवेज अशरफी, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट चे चेअरमन युनुस तांबटकर, सेक्रेटरी इमरान गुरु, प्रा.बाळासाहेब पवार, इरफान भाई, संजय शिंदे, सचिन सोनवने, आसिफ दुलेखान आदि मान्यवर उपस्थित होते.


रुगणांची तपासणी नेत्र विज्ञानी संजय शिंदे,सचिन सोनवने,ओमकार वाघमारे यांनी केली. रक्ताचे तपासणया पन्नास टक्के सहुलतीच्या दरात शाहनवाज़ तांबोली,शेर अली तांबोली,शिबा अंन्सारी,नदिम शेख,मुस्तफा तांबोली,आवेस कुरैशी यांनी केली. या शिबिरामध्ये 117 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 30 ते 35 रुगणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आनंदऋषी नेत्रालय येथे अल्पदरात केली जाईल. ज्यांना डोळ्याला नंबरचा चष्मा लागला आहे अशांना अल्पदरात चष्मे देण्यात आले.


सुत्र संचालन आबीद खान यांनी केले.प्रस्ताविक करतांना ट्रस्ट चे सेक्रेटरी इमरान गुरु यांनी मिसगर डायग्नोस्टिक सेंटर च्या वतीने राबविण्यात येणारया विविध उपक्रमांची माहिती दिली.आभार डॉ.परवेज अशरफी यांनी मानले. कार्यक्रम यशस्विते साठी रुगणमित्र नादिर खान,तारीक शेख,जावेद मास्टर, फिरोज शेख, शफकत सैय्यद, अबरार शेख आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!