महात्मा गांधी यांनी ‘सत्य व अहिंसा’ ही जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी : डॉ.अब्दुस सलाम सर

नगर - भारतीय स्वातंत्र्य लढयात महात्मा गांधी यांचे योगदान मोठे आहे. देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे जगातील महान स्वातंत्र्यसेनानी ठरले. सत्य आणि अहिंसा ही त्यांनी जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी लालबहादूर शास्त्री यांनीही स्वातंत्र्य चळवळीत योगदान देऊन स्वातंत्र्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला प्रगतीपथावर नेले. अशा या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींची शिकवण आपणासर्वांना सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम सर यांनी केले.


मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल, मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅरण्ड सायन्स फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू माध्यम) व मासुमियाँ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मुकुंदनगर, अहमदनगर येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. 

 

यावेळी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम सर, उपसचिव शेख अ.अजीज अ.रहेमान, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना बाजी, शबाना बाजी, तलमीज सर, शबाना मॅडम, एजाज सर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन बहार बाजी यांनी केले तर तलमीज सर यांनी आभार मानले.

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक संकुलाच्यावतीने महात्मा गांधी व स्वातंत्र्य सेनानी लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम सर, उपसचिव शेख अ.अजीज अ.रहेमान, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना बाजी, शबाना बाजी व तलमीज सर, शबाना मॅडम, एजाज सर आदि.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!