चंद्रघंटा...

चंद्रघंटा...
अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजर्‍या केल्या जाणार्‍या नवरात्रातील तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप मानले जाते. नवरात्रात तिसर्‍या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. सन 2021 मध्ये 7 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 रोजी नवरात्राची तिसरी माळ असून, चंद्रघंटा देवीची महती, स्वरुप, महात्म्य, महत्त्व, पूजाविधी आणि मंत्र जाणून घेऊया...


चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढर्‍या फुलांची एक माळ आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम. तसेच चंद्रघंटा देवीला पांढर्‍या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जात आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, असे म्हटले जाते.

चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.
पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:॥


भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसर्‍या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!