देशात शांतता-बंधुभाव राखणे आणि भुकेल्यांना अन्न देणे ही आपली जबाबदारी - मौलाना सज्जाद नोमानी
अंजर अन्वर खान नदवी यांनी अहमदनगर येथून अखिल भारतीय उलामा बोर्डाच्या माध्यमातून शांततेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण देश एकत्र केलानगर - आज पर्यंत न्यायप्रेमीं तर्फे जे कार्य व्हायला हवे होते ते झाले नाही, याउलट न्यायवर विश्वास नसणाऱ्या कडून भरपूर काम झाले आहे. आम्ही फक्त बोलून किंवा मोर्चे काढून व संमेलन घेऊन समाधानी झालो पण यामुळे आम्ही इतरांप्रमाणे पुढे नाही जाऊ शकतो. असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले.
ऑल इंडिया उलमा बोर्डाचे वतीने नवी दिल्ली येथे शांती व न्यायासाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक संमेलन 2021 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौलाना सज्जाद नोमानी बोलत होते. याप्रसंगी सनातन धर्माचे स्वामी विश्व आनंद महाराज, फादर एम.डी.थाॅमस, दर्गा खाजा निजामुद्दीन चे अफसर अली निजामी, सुप्रीम कोर्टाचे सिनियर एडवोकेट मकरन्द ज्ञानेश्वर अडकर, सिराजुद्दीन कुरेशी , डॉ सय्यद फारूख हिमालय ड्रग्स कंपनी,मुख्तार अहमद हज कमिटी अधयक्ष, दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जाकिर मंसुरी,सलमान निज़ामी, नात ख्वा दानिश दवर, उलमा बोर्डचे जनरल सेक्रेटरी अंजर अन्वर खान नदवी,फ़ायनन्स जनरल सेक्रेटरी वारिस अली,बोर्डचे उपाध्यक्ष नायब अंसारी,मोहमद इमरान ,ज़ाहिद हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
मौलाना सज्जाद पुढे बोलताना म्हणाले की सरकारी रिपोर्ट नुसार देशात भुखमरीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना जमिनीवर राहणाऱ्या लोकांसाठी कार्य करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे नमुद केले. राजरत्न आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान वर सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन केले. फादर थॉमस यांनी सर्वांना मिळून गंगा जमनी संस्कृती वाढविण्यासाठी कार्य करण्याचे सांगितले. स्वामी विश्व आनंद महाराज यांनी सांगितले की मानवाला सत्यासाठी गुन्हेगारी मुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी अजून अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना मानव जातीसाठी त्यांच्या गरजा व एकात्मतेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक उलमा बोर्डाचे जनरल सेक्रेटरी यांनी करताना बोर्डाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.व पाहुण्यांचे स्वागत केले.सुत्रसंचालन हाफीज असरार नन्दी यांनी केले. आभार बोर्डचे फाइनांस जनरल सेकेट्ररी वारिस अली यानी मांडले।कार्यक्रमास देशभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. महिलांचे प्रमाणही चांगले होते. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
