संविधानातील लोकशाहीचे मुल्य नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम शिक्षकांनी करावे - प्रा.डाॅ. सलाम सरनगर - गेल्या काही वर्षापासू अनेक व्यक्ती आणि सामाजिक संस्था, संघटना संविधानांचे महत्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. राज्य घटनेची मूलतत्वे, नागरिकांना दिलेले हक्क आणि त्यांची कर्तव्ये, विविध कायद्यांची माहिती आणि त्यांचे उपयोग पटवून देणारा हा जागर नव्या पिढीतून उद्याचे जबाबदार नागरिक घडविणारा आहे. यात शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. लोकशाहीचे मुल्य नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी केले.
संविधान दिनानिमित्त मोहमंदीया एज्युकेशन सोसायटीच्या मौलाना आझाद उर्दू हायस्कूल मातोश्री उर्दू प्राथमिक कन्या शाळा व डी.एड., बी.एड. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुस सलाम सर, मुख्याध्यापक शेख फरहाना, सय्यद नौशाद, अंजुम खान आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना ‘संविधाना’ची शपथ देण्यात आली.
यावेळी फरीदा जहागीरदार यांनी संविधाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलमीज सर यांनी केले तर आभार बहार अंजुम यांनी मानले.
