मुलगी शिकली तर संपूर्ण परिवार शिकल्यासारखे- मेहताब आलम
मखदूमच्या कौमी एकता सप्ताहाअंतर्गत ‘महिला शिक्षण’ यावर व्याख्यान संपन्ननगर-पूर्वीच्या काळापासूनच शिक्षणाला महत्त्व आहे. पण पुरातन काळ म्हणा किंवा स्वतंत्र पूर्वीचा काळ बघितला तर निदर्शनास येते की, महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी होते. पुरुषप्रधान राहिलेले या जगात महिलांच्या बाबतीत धोरण ठरविण्यात न्याय नाही झाला. पण थोर समाजसेवकांनी केलेल्या प्रबोधनामुळे आज महिला शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुटुंबात जर एखादा मुलगा शिकला तर तो फक्त एकटाच शकतो, पण जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकल्यासारखेच आहे, असे प्रतिपादन भोपाळ येथील इतिहास संशोधक व उर्दू साहित्यकार मेहताब आलम यांनी केले.
मखदूम सोसायटीच्या कौमी एकता सप्ताहामध्ये मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मौलाना आझाद हायस्कूल येथे ‘महिला शिक्षण’ या विषयावर मेहताब आलम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम, अहमदनगर जिल्हा उर्दु साहित्य परिषदेच्या सहसचिव कवयित्री डॉ. कमर सुरुर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मेहताब आलम म्हणाले की, मुलगी हे शिक्षण घेऊन प्रथम आई-वडिलांचे घर, लग्नानंतर नवर्याचे घर. सर्वांना बरोबर घेऊन घर संसार चालवते. त्याचप्रमाणे पुढे येणार्या पिढीला ही संस्कारीत करण्याचे काम महिलांच्या हातातच असते.आज शिक्षणामुळेच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे, ही भुषणावह बाब आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अब्दुस सलाम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कमर सुरुर यांनी केले. तर आभार आबीद खान यांनी मांनले. कार्यक्रमास विद्यालय व महाविद्यालयातील विधार्थींनी व शिक्षिका उपस्थित होत्या.