मखदुम सोसायटीच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित विधार्थांना पुस्तके वाटप
सामाजिक न्याय, समता, विश्वबंधुत्व; राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव ही मूल्ये आंबेडकरांनी देशात रुजविली.-आबीद खाननगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीधर्माच्या महिलांना, बहुजनांना न्याय मिळवून दिला. कामगारांना साप्ताहिक सुट्टीपासून अनेक अधिकार मिळवून दिले. संविधानातून सामाजिक न्याय, समता, विश्वबंधुत्व; राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव ही मूल्ये त्यांनी देशात रुजविली. गरीब-श्रीमंत उच्च-नीच हे भेदभाव संविधानामुळे मिटविणारी लोकशाही देशात नांदत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन प्रचंड संघर्षावर आधारलेले आहे. त्यांनी हजारो वर्षांच्या व्यवस्थेशी संषर्घ केला. त्यांनी उभारलेला समतेचा लढा मानवमुक्तीचा लढा म्हणून जगभर आदर्श ठरला आहे. जगभरातील समतेच्या, मानवाधिकार चळवळीला प्रेरणा आंबेडकरी विचारातूनच मिळते.
अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यापीठात ते शिकले. त्या विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून ज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे, असे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले. मखदुम सोसायटीच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.उर्दु प्राथ.शाळा दर्गादायरा येथिल विधार्थांना मुलांच्या साहित्याची पुस्तके मोफत वाटप करुन वाचन करुन घेण्यात आली.याप्रसंगी मौलाना साहब, मुख्याध्यापिका नसीम शेख, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, नाज़नीन शेख,समीना शेख,शाकेरा शेख,आसमा सैय्यद आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीम शेख यांनी केले. तर आभार आस्मा सैय्यद यांनी मानले.
