उरफीया जफर सय्यद हीने साकारली अरबी कॅलीग्राफी चित्रे
नगर - कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला-गुणांना वाव देऊन त्यावर कार्य केले. पालकांनीही त्यांना प्रोत्साहीत केले. येथील सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थीनी सध्या अहमदनगर कॉलेजमध्ये एस.वाय.बी.ए.ला शिक्षण घेणारी उरफिया जफर सय्यद हीने अरबी भाषेची आवड असल्यामुळे त्या भाषेत तिने उत्तम कॅलीग्राफी करुन अनेक चित्र साकारली. जे बधून लोकांना विश्वास बसेना की एवढे सुंदर व अचुक अरबी कॅलीग्राफी तयार केली आहे.तिच्या या कलेला आई कमर सय्यद, आजी असफीया मसुद सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. असफीया ही सत्कार केक शॉपचे संचालक जफर सय्यद यांची कन्या आहे. तिच्या या कलाकृतीचे अनेक मान्यवरांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
