उत्तर प्रदेशात आजही गुंडा राज ? डॉ परवेज अशरफी

अहमदनगर मध्ये ही एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आले

नगर - उत्तर प्रदेशात निवडणुकीचा रणसंग्राम चालू असून सर्व पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे. त्यात हैदराबाद येथून महाराष्ट्र, बिहार चा प्रवास करत उत्तर प्रदेशात आपले पक्षाला बळकट करण्यासाठी आलेले एम आय एम ही आपली पूर्ण ताकत लावत आहे. भागीदारी परिवर्तन मोर्चाचे माद्य्यमातून उत्तर प्रदेशची जनतेला तिसरा परयाय देयासाठी एक प्रयत्न करण्यात आले आहे. मेरठ येथे आपले पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करून खासदार ओवेसी आपल्या काफिल्या सोबत दिल्लीला रवाना झाले. मेरठ दिल्ली टोल नाक्यावर काही समाजकंटकने खासदार ओवेसी यांच्यावर गोळ्या झाळून हल्ला केला. त्यात ओवेसी आणी त्यांचे सहकारी बचावले. याचा निषेध पूर्ण देशात व्यक्त करण्यात येत आहे


अहमदनगर मध्ये ही एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आले.यावेळी डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की खा.ओवेसी यांच्यावर झालेला हल्ला हा खूप निंदनिय आहे. उत्तर प्रदेशात जर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष वेळेचे खासदार सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय?. या घटनेमुळे योगी सरकार जे आपले भाषणात गुंडा राज संपल्याचा दावा करत आहे ते खोटे असल्याचे दिसते. असद साहेबांची लोकप्रियता पाहून विरोधी पक्षाच्या नेतेंना आपल्या पाया खलीची जमीन सरकल्याचे दिसते. ज्या उत्तर प्रदेश मद्य्ये देशाचे गृह मंत्री आपल्या भाषणात सांगतात की बाहुबली संपले, त्याच प्रदेशात हल्ले होतात.


सरकार कडे खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांना हल्ले मागचा मास्टरमाईंड शोधून काढण्याची विनंती केली आहे. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार,कार्याध्यक्ष मतीन शेख, शहर युवा अध्यक्ष अमीर खान, महासचिव इम्रान शेख, विध्यार्थी शहर अध्यक्ष सनाउल्लाह तांबटकर, डॉ सादीक, शाह फैसल, हाफिज उमेर, आयनुल शेख, फहीम शेख, तौसीफ इनामदार, बशीर शेख, आदी. उपस्तीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!