नगर - 4 मे 2020 राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नवीन नियमित शिक्षक भरती संबंधी शिक्षणमंत्री यांना पत्र दिले. घटनेच्या कलम 30(1)च्या अल्पसंख्यांक शाळांच्या शिक्षक भरतीमध्ये शासनाने खास बाब म्हणून परवानगी द्यावी. तसेच सन 2015-16 विद्यार्थी स्कूल रिपोर्ट कार्डनुसार ज्या अल्पभाषिक शाळांची विद्यार्थी संख्येनुसार प्रस्तावित पदे दिली आहेत, ती सन 2021-22 पासून नियमित करण्यात यावीत अशी मागणी मोहंमदिया एज्युकेशन सोसासायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ना.ज.मो. अभ्यंकर यांच्याशी चर्चा करतांना केली.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ना.अभ्यंकर नगर दौर्यावर आले असता त्यांचे डॉ.सलाम सर यांनी त्यांचे स्वागत करुन उर्दू शाळेच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी ना. अभ्यंकर यांनी या आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मंत्रीमंडळापुढे मांडून पाठपुरावा करु. त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांकडील मागण्याही पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशिल राहील, असे आश्वस्त केले. यावेळी मुख्याध्यापक जमीर शेख, प्रा.अंबादास शिंदे आदि उपस्थित होते.अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ना.ज.मो.अभ्यंकर याचे स्वागत करुन सत्कार करतांना डॉ.अब्दुस सलाम सर. यांनी त्यांचे स्वागत करुन उर्दू शाळेच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. मुख्याध्यापक जमीर शेख, प्रा.अंबादास शिंदे आदि उपस्थित होते.
