अलहाज मुज्जफर खान यांचे दु:खद निधन

अलहाज मुज्जफर खान यांचे दु:खद निधन

नगर - पाचपीर चावडी येथील रहिवाशी अलहाज मुज्जफर खान मोहियोद्दीन खान (बाबूशेठ रेवडीवाले) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 92 वर्षांचे होते. त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड होती. ते अल फलहा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तसेच मोहंदिया एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व चाँद सुलताना हायस्कूलचे माजी उपसचिव होते.


सामाजिक व धार्मिकवृत्तीमुळे मुकुंदनगर येथील एरिगेशन मस्जिद, जामा मस्ज़िद व पाचपीर चावडी येथील रोडगाह मस्ज़िदच्या बांधकामासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंड, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी लालटाकी येथील जलाल शाह बुखारी कब्रस्तानमध्ये करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!