मोहंममदीया एज्यु.सोसा.तर्फे शिरिष कुमार यांना अभिवादन

मोहंममदीया एज्यु.सोसा.तर्फे शिरिष कुमार यांना अभिवादन

शिरिषकुमार यांनी स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या घेत स्वत:चे बलिदान दिले - प्रा.डाॅ.अब्दुस सलाम

नगर - महाराष्ट्रातील नंदुरबार येथील शिरिषकुमार पुष्पेंद्रभाई मेहता या आठवीत शाळेत शिकणार्‍या मुलाने आपल्या देशासाठी बलाढ्य ब्रिटीश सत्तेला देशप्रेमाचे कर्तुत्व दाखवून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाला होता. यामध्ये छातीवर गोळ्या घेत स्वातंत्र्यासाठी स्वत:चे बलिदान दिले ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मोहंम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. अब्दुस सलाम सर यांनी केले.

मुकुंदनगर येथील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीच्या मासुमिया डी.एल.एड. व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या प्राथमिक शाळेत बालहुतात्मा शिरिषकुमार यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.डाॅ.सलाम सर बोलत होते. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद खान, फरजाना शेख, मुमताज शेख,हिना शेख,शाहीन शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी शहीद बाल शिरिषकुमार यांच्या जीवनावर निबंध सादर केले. पुढे बोलतांना प्रा.डाॅ.सलाम म्हणाले की,शाळेत शिक्षण घेत असतांना शिरिषकुमार यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श समोर ठेवून स्वातंत्र्य, देशाभिमान यांचे धडे घेतले. नंदुरबारमध्ये मोर्चा काढला, आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 9 सप्टेंबरला नंदुरबारला प्रभात फेरी निघाली. तिरंगा झेंडा हातात घेवून वंदे मातरम्, भारत माता कि जय घोषणा दिल्या. संतप्त झालेल्या इंग्रज पोलिसांनी शिरिषकुमार यांच्या हातातून झेंडा घेण्याचा प्रयत्न केला. प्राण घ्या.. पण झेंडा मिळणार नाही, असे प्रतिउत्तर देत पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला. त्यामुळे बाल हुतात्मा म्हणून बाल क्रांतीकारक शिरिषकुमार यांचे स्मारक आजही बलिदानाचे साक्ष देत आहे, असे नमुद केले.

प्रस्तावीक करतांना असलम पटेल यांनी शिरिषकुमार यांचे स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, देशप्रेमासाठी कर्तुत्व दाखविणारा लहानसा शिरिष यांच्या आठवणींना उजाळा देत आजच्या पिढीने आदर्श घेण्याची खरी गरज आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुलताना शेख यांनी केले.आभार यास्मीन शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!