अल करम हाॅस्पिटल तर्फे प्रजास्ताक दिना निमित रक्तदान शिबिराचे आयोजन
अहमदनगर -अल करम हाॅस्पिटल, सोनोग्राफी सेंटर अँणड मँटर्निटी नर्सिंग होम यांच्या वतीने प्रजास्ताक दिना निमित बुधवार दि. 26 जनवरी 2022 रोजी महेश मंगलकार्यालय रामचंद्रखुट येथे सकाळी 9 ते 5 वाजे पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लाँकडाऊन काळात रक्तदान शिबीरांची संख्या फार कमी झाली आहे.पण रक्ताची मागणी तशिच आहे. व गरजुंना फार अडचण येत आहे. तयामुळे शासना तर्फे वारंवार रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. म्हणुन आपली जवाबदारी समजुन प्रजास्ताक दिनाच्या शुभ अवसर वर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे.
महिलांना रक्तदान साठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शेर अली शेख,शोएब शेख यांच्याशी 9921991492, 9225559984 या नंबर वर संपर्क करुन किंवा समक्ष नांव नोंदणी करावी. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
