सामाजिक कार्यकर्ते युनुसभाई तांबटकर आणि सहकार्यांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने
अटक करुन मोकांतर्गत कारवाई करणे; जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे मागणी ! २८ जानेवारी रोजी धरणे आंदोलनाचा इशारा !
हल्ला करणारे आरोपी गेले सहा दिवस मोकट आहेत.
त्यांच्यापासून सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या
जिवीताला धोका असून पोलिस प्रशासनाने आरोपींना
पकडण्यात अक्षम्य हलगर्जीपणा' केला आहे.
मा. पोलिस अधिक्षक यांनी या गंभीर प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून आरोपींना तातडीने अटक करून मोकांतर्गत कारवाई करावी. या संदर्भात कारवाई न झाल्यास दि. २८.१.२०२२ रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे, किसन सभेचे अॅड. बन्सी सातपुते, भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्षा स्मिता पानसरे, माकपचे प्रा. महेबुब सय्यद, प्रा.बाळासाहेब पवार, ऊर्जिता फौंडेशनच्या संध्या मेढे, अर्शिया तांबटकर, अहमदनगर हॉकर्स संघटनेचे संजय झिंजे, पीस फौंडेशनचे अर्शद शेख, मराठा सेवा संघाचे इंजी. अभिजीत वाघ, रामभाऊ धोत्रे, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर, रविंद्र वाबळे, सत्यशोधक शिक्षक सभेचे सतीश सातपुते, जावेद मास्टर, अरिफ सय्यद, फरहान खान, शब्बीर उस्मान गनी काझी, विठ्ठल बुलबुले, खलील रहमान तांबटकर, इम्रान जमीर खान, कलीम इलियास शेख, शेख जावेद महेमुद आदी उपस्थित होते.
आरोपींवर कडक कारवाई करून सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील यांना कारवाईपत्र देताना अॅड. सुभाष लांडे, संजय झिंजे, अर्शिया तांबटकर, संध्या मेढे, भैरवनाथ वाकळे, बाळासाहेब पवार, इंजी. अभिजीत वाघ, खलील रहमान तांबटकर, इम्रान जमीर खान आदी.
