सक्षम फौंडेशनच्यावतीने रस्त्यावरील निराधारांना ब्लँकेटचे वाटप

सक्षम फौंडेशनच्यावतीने रस्त्यावरील निराधारांना ब्लँकेटचे वाटप

नगर - सक्षम फौंडेशनच्यावतीने रस्त्यावरील निराधार लोकांना ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे एस.एफ.तांबोळी, विक्रम पवार, निलेश भिंगारदिवे, तलहा शेख, साबीर शेख, जाकीर शेख, विलास पंडित, तन्वीर शेख आदि उपस्थित होते.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून थंडी कायम असून, सध्याही सर्वत्र थंडीची मोठी लाट आली आहे. अशा परिस्थितीत घरामध्ये राहून उबदार कपडे घातले तरी थंडीची वाजते. परंतु अशा थंडीतही अनेक निराधार रस्त्यावर रात्र काढत आहेत. अशा लोकांचा आपण विचार करतो, परंतु कृतीतून तो प्रत्यक्षात थोडेच लोक आणत असतात. सक्षम फौंडेशनने अशा रस्त्यावरील निराधारासाठी उबदार ब्लॅकेटची वाटप करुन कुडकुडणार्‍या थंडीत मायेची उब दिली आहे. आज आशा उपक्रमांची गरज आहे. समाजातील वंचित-गरजूंना मदत करुन त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. सक्षम फौंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सक्षम फौंडेशनच्यावतीने रस्त्यावरील निराधार लोकांना ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे एस.एफ.तांबोळी, विक्रम पवार, निलेश भिंगारदिवे, तलहा शेख, साबीर शेख, जाकीर शेख, विलास पंडित, तन्वीर शेख आदि.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!