प्रगत कला महाविद्यालयात लघू प्रतिकृती प्रात्याक्षिक संपन्न

प्रगत कला महाविद्यालयात लघू प्रतिकृती प्रात्याक्षिक संपन्न




नगर - येथील प्रगत कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लघू प्रतिकृती या वेगळ्या विषयावरील प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. यात प्रगतचे माजी विद्यार्थी व सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅप्लाईड आर्ट या शाखेतील उच्च शिक्षण घेतलेले रामदास पोपळघट व सागर लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अ‍ॅप्लाईड आर्ट, आर्ट डायरेक्शन, जाहिरात क्षेत्र या विषयांसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन केले. लहान मॉडेल बनवतांना कोणकोणत्या अडचणी येतात व त्यांना कसा न्याय दिला पाहिजे उदाहरणांसह सांगितले.

समोरच एका घराचे मॉडेल बनवितांना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.यावेळी प्रा.महावीर सोनटक्के, प्रा. संजय काळे उपस्थित होते. प्राचार्य नुरील भोसले यांनी दोन्ही कलाकारांचा सत्कार केला. प्राचार्य नुरील भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळविण्यासाठी असे उपक्रम नियमित राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

कलाकार रामदास पोपळघट यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की माझ शिक्षण होस्टेल मध्ये झाल. प्रगतकला महाविद्यालया मध्ये फाउंडेशन कोर्स केला.प्रा. नुरिल भोसले सर यांच्या मार्गदर्शना खाली मी फाउंडेशन कोर्स पूर्ण केला. पुढील शिक्षणा साठी मुम्बई मधील सर.जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये प्रवेश घेऊन डिग्री घेतली. कॉलेज मध्ये असताना बाहेर खुप कामे केली. त्या मध्ये सर्वात जास्त मिनिएचर मॉडल ची कामे केली .स्टॉप मोशन ऐड साठी मिनिएचर सेट तयार करण्याचे काम केले. Makan.com, kurkure, amazon prem, आणि खुप सारे इंन्स्टाॅलेशन , विन्डो डिस्प्ले साठी कामे केली. मूवी मध्ये असिस्टन्ट आर्ट डायरेक्टर या पदावर काम केले . प्रोडक्शन डिज़ाइनर लक्ष्मी केलूसकर यांच्या मार्गदर्शना खाली खुप साऱ्या ऐड आणि मूवी मध्ये काम केले.छिछोरे, बागी 2 , बधाई हो, फ्रीडम , या मूवी मध्ये काम केले.

नासिक डायोसिसन कौन्सिल पी.टी.आर.डी.2 संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बीशप साहेब पी.एल.कांबळे व सचिव अॅड. विनायक पंडीत यांनी प्रगत कला महाविद्यालयाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.



प्रगत कला महाविद्यालयात लघू प्रतिकृती प्रात्यक्षिक विषयावरील प्रात्यक्षिकाचे आयोजित केले होते. रामदास पोपळघट व सागर लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!