महिलां विषयी समाजाने आपला दृष्टिकोन बदलल्यास ते सावित्रीबाई फुलेंना खरी श्रद्धांजली ठरेल- प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर
नगर - महिलांना गुलाम समजणाऱ्या त्यांना हीन व वस्तू समजणाऱ्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या परिस्थितीत समाज मानसिकता बदलण्यासाठी कार्य केले. व समाज बदलून दाखवला. त्यामुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. तरी सुद्धा आज समाजामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अशावेळी समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास ते सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.असे प्रतिपादन मोहंम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी केले.मुकुंदनगर येथील मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कूल, मदर तेरेसा उर्दु ज्युनियर कॉलेज, मासुमिया डीएड कॉलेज, मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, नौशाद सय्यद, असलम पटेल, हसिब शेख, तलमीज सर आदी उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चौथी ते डीटीएड च्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून उर्दू-हिंदी- मराठी व इंग्रजीत आपले वक्तृत्व सादर केले. त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलताना शेख यांनी केले. तर प्रास्ताविक फरजाना शेख यांनी केले. तर आभार यास्मिन शेख यांनी मांनले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुमताज शेख,हीना शेख, शाहीन शेख व संस्थेच्या सर्व शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.

Very nice
ReplyDelete