शनिवारी सूनेहरी गीतांची महेफिल

शनिवारी सूनेहरी गीतांची महेफिल 

रेट्रो से मेट्रो तक चे आयोजन

नगर- कोरोना काळात सतत घरी असणाऱ्या रसिकांसाठी फेसबुक लाईव्हचे दोनशेपेक्षा जास्त हिंदी मराठी गीतांच्या महेफीलचे आयोजन करणारे अॅड.अमीन धाराणी व अॅड.गुलशन धाराणी यांनी गाता रहे मेरा दील कराओके ग्रुपच्या माध्यमातून आता रेट्रो से मेट्रो तक सुनेहरी हिंदी गीतांची मैफिलीचे शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7-30 ते रात्री 10-30 पर्यंत सावेडी येथील माऊली सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात हौशी गायक दीपा भालेराव,गुलशन धाराणी, वर्षा जांभेकर(पुणे) अनिल खंडागळे, प्रशांत बंडगर, सुनील भंडारी, नरेश पेवाल, अभिजीत गायकवाड, अमीन धाराणी, संजय माळवदे हे गीत सादर करणार आहे.असे संजय माळवदे यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमास इझी इलेक्ट्रॉनिक्स,हैदर पेंटर, भारत स्टील फर्निचर,डी.के. इंटेरियर,हॅपी होम फर्निचर, डी.आर.के.डेव्हलपर्सचे सहकार्य लाभले आहे.

या गीतांचे मैफिलीचे सर्व गीतांची आवड ठेवणाऱ्या रसिकांनी कोरोनाचे नियम पाळत मास्कचा वापर करुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. प्रवेशिका आवश्यक असून 7040119988 या नंबर वर संपर्क करुन आपली प्रवेशिका घ्यावी असे आवाहन अमीन धाराणी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!