मध्यप्रदेश सांस्कृतिक विभागाचे डॉ. कमर सुरूर यांना निमंत्रण

नगर - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे "कश्मीरी पंडितांचा उर्दू भाषा व साहित्य मध्ये सहभाग" या विषयावर सेमिनार, कहाणी पाठ व मुशायरयाचे सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी भोपाल येथे आयोजन करण्यात आले आहे. 


यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागातील साहित्यकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अहमदनगर मधून डॉ.कमर सुरुर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. स्वतंत्रयाच्या अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाच्या उर्दू अकादमी तर्फे या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये लेखक, कवी, समीक्षक, अभ्यासक आणि कलावंतांच्या उपस्थितीत परिसंवाद, चर्चासत्र आणि मुशायरा सादरीकरण होणार आहे. असे मध्य प्रदेश उर्दु अकादमी च्या निदेशक डॉ. नुसरत मेहदी यांनी डॉ. कमर सुरुर यांना कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!