थॅलेसेमिया रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक - डाॅ.विजय रमणन्
नगर - एन.एन.सथ्था काॅलेज ऑफ फार्मसी, केशर गुलाब मंगल कार्यालय जवळ, आनंद धाम रोड, अहमदनगर येथे 8मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ऋतुजा फाऊंडेशन, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, एन.एन.सथ्था काॅलेज ऑफ फार्मसी, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन, एम.व्ही.आर.फाऊंडेशन पुणे आयोजित भव्य थॅलेसेमिया मायनर तपासणी, थॅलेसेमिया योद्ध्यांची वार्षिक तपासणी, रक्तदान , अवयव दान, बोन मॅरो रजिस्ट्रेशन अश्या पाच शिबिरांचे आयोजन करण्यात आले.प्रमुख वक्ते डाॅ.विजय रमणन (रक्त विकार तज्ज्ञ, बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना थॅलेसेमिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी कोणत्या तपासण्या आवश्यक आहे. स्वतःची लग्ना अगोदर थॅलेसेमिया मायनर टेस्ट का करून घ्यावी? हे सांगितले. दरवर्षी जवळपास 20000 रूग्ण जन्माला येतात हा आकडा भयानक असून कमी झाला पाहिजे गेल्या 2-3 वर्षातील थॅलेसेमिया रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे असे सांगितले. ऋतुजा फाऊंडेशन दरवर्षी आयोजित करत असलेल्या मेळाव्याचे आणि शिबिरांचे कौतुक वाटते असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह चे अध्यक्ष ॲड. विद्याधरजी काकडे यांनी ऋतुजा फाऊंडेशन आणि जिल्हा रूग्णालयाच्या संयुक्तिक रित्या करत असलेले कामाचे कौतुक केले. थॅलेसेमिया जनजागृतीपर कार्यक्रम आणि तपासणी शिबीर कायम आयोजित करण्याचे आश्वासन दिले. डाॅ.ॲड.अंजली केवळ यांनी स्वतःच्या मुलीला थॅलेसेमिया असल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवातून इतरांवर वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागू नये त्या साठी घेतलेला समाजसेवेचा वसा खरच कौतुकास्पद आहे आणि आम्ही त्यांना कायम मदत करू असे सांगितले. डाॅ. विजय रमणन सारख्या डाॅक्टरांची समाजाला गरज आहे. संपूर्ण देशात त्यांचे जनजागृतीपर कार्यक्रम चालू असतात याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.समीर निकम (सचिव, थॅलेसेमिया सोसायटी, महाराष्ट्र) यांनी समाजातील प्रत्येकाने आपल्या सभोवताली लक्ष ठेवायला पाहिजे. डोळसपणे समाजात वावरले पाहिजे. सर्व थॅलेसेमिया रूग्णांसाठी देव असलेल्या डाॅ.विजय रमणन यांचा "गाॅड ऑफ थॅलेसेमिया"ने मानचिन्ह देऊन थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र तर्फे सन्मान करण्यात आला.
आय.एम.एस.सी.डी.आर.काॅलेजचे डायरेक्टर डाॅ.एम.मेहता ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले.डाॅ.रुपाली कुलकर्णी यांनी कोविडनंतर हिमॅटाॅलाॅजी डे केअर सेंटर अहमदनगर येथे पूर्ववत थॅलेसेमिया रूग्णांना मोफत रक्त संक्रमण आणि लोह कमी करण्याचे चेलेशन औषधे तसेच इतर आवश्यक औषधोपचार सुरू झाले आहेत. तरी रूग्णांनी याचा लाभ घ्याव्या आणि जास्तीत जास्त रूग्णांनी रक्त संक्रमण साठी जिल्हा रूग्णालयात यावे असे आवाहन केले. ल्युकोसाईट फिल्टर उपलब्ध होण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच ते चालू होईल असे डाॅ.कुलकर्णी यांनी सांगितले. डाॅ.गणेश मिसाळ ( बालरोग तज्ज्ञ) यांनी आणि त्यांच्या टीमने रूग्णांची तपासणी केली.ऋतुजा फाऊंडेशच्या उपाध्यक्षा डाॅ.ऋतुजा केवळ यांनी थॅलेसेमिया योद्ध्यांशी आणि पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
डाॅ.विक्रम पानसंबळ(वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय), डाॅ. विशाल पांडे ( प्राचार्य, एन.एन.सथ्था काॅलेज ऑफ फार्मसी) विकास गवळी ( विभाग प्रमुख, डी. फार्मसी), सम्राट दयाल( अध्यक्ष, थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र), मनोज भदगले (रेड क्रॉस सोसायटी, पुणे), आशिष इरमल(जिल्हा समन्वयक, अहमदनगर), अविनाश कराळे( समुपदेशक, जिल्हा रूग्णालय, अहमदनगर), सतपाल सिंग (ब्लड मोटिव्हेटर), महेश केवळ ( ऋतुजा फाऊंडेशन), आनंद परमार ( तुलसीभाई फरसाण), श्री. घाणेकर सर, सचिन गुलदगड (अध्यक्ष, संत सावता माळी प्रतिष्ठान), जनकल्याण रक्तपेढीच्या सोनाली खांदवे, आनंदऋषीजी रक्तपेढीचे सुनील महानोर, अंजना फाऊंडेशनचे ऋषी इवळे , प्रा.गौरव सोनवणे,प्रा.ऐश्वर्या शिंदे आदी उपस्थित होते. बाळासाहेब देशपांडे शासकीय रक्तपेढीचे विशेष आभार त्यांनी रक्तदान शिबिरासाठी 25 दात्यांचे रक्त संकलन करून विशेष सहकार्य केले.धात्री स्टेमसेल बॅकचे आभार.सुमन ग्राफिक्स चे सचिन भंडारी, आदरणीय नरेंद्रकुमारजी फिरोदिया, दात्री स्टेमसूल बॅक, महेश राहींज, आस्था लॅबचे रेवननाथ काळे यांचे अमूल्य सहकार्याबद्दल मनापासून आभार.
थॅलेसेमिया योद्ध्यांनी (पेशंटनी) हजर राहून सगळ्या तपासण्या मोफत करून घेतल्या. थॅलेसेमिया योद्धा श्रीरंग बेदरे याने त्याच्या नृत्याने आणि त्याच्या शायरीने उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक ॲड.डाॅ.अंजली केवळ तर आभारप्रदर्शन रेखा चुत्तर आणि सूत्रसंचालन सी.ए.आकांक्षा चुत्तर यांनी केले.


