मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
राजभाषेमुळे दैनंदिन व्यवहाराबरोबर रोजगार मिळण्यास मदत - प्रा.डॉ. अब्दुस सलामनगर - आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याच्या भाषा आपणास अवगत असणे गरजचे आहे. त्या माध्यमातून आपले दैनंदिन व्यवहार हे सुरळीत होण्यास मदत होतेच त्याबरोबर रोजगार मिळण्यासही मदत होत असते. आज अनेक अल्पसंख्यांत शिक्षण संस्था आहेत, त्याचप्रमाणे नर्सरीपासून देशातील विविध विद्यापीठांचे शाळा प्रत्येक ठिकाणी निर्माण होत आहे. अशा शाळांना महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून मराठी भाषा सक्तीचे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मराठी भाषा लवचिक व गोड आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ निर्माण होत असल्याने भाषेतून तुमचे हावभावही व्यक्त होत असतात. अशी मराठी भाषा आपण चांगल्या पद्धतीने शिकल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी केले.
मुकुंदनगर येथील मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने मौलाना आझाद हायस्कूल येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, यावेळी प्राचार्य डॉ.शेख फारुक फकिर मोहंमद, मराठी भाषाप्रमुख सय्यद शबाना, डॉ.एजाज कुदुस, शेख शबाना बाबुलाल आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवात कुराण पठाणाने झाली, स्वागतगीत छात्रशिक्षिकांनी सादर केले. विद्यार्थ्यांच्यावतीने खुशबु अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन छात्रशिक्षिका सय्यद रोझमिन व शितल भस्मे यांनी केले. आभार अर्पिता भिंगारदिवे यांनी मानले. यावेळी छात्र शिक्षकांनी मराठी भाषेची वेगवेगळी रुपे संवादातून सादर केली. कार्यक्रमास छात्रशिक्षिका, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
मुकुंदनगर येथील मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने मौलाना आझाद हायस्कूल येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर, प्राचार्य डॉ.शेख फारुक फकिर मोहंमद, मराठी भाषाप्रमुख सय्यद शबाना, डॉ.एजाज कुदुस, शेख शबाना बाबुलाल, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदि.