त्यांच्या विचारसरणीची सरकार नसल्याने असे वक्तव्य - डॉ परवेज अशरफी
नगर - सध्या महाराष्ट्रात एक ट्रेंड चालला आहे की भारताचे महापुरुष यांच्या बद्दल वादग्रस्त चुकीची विधाने करून जनतेला फूस लाऊन द्याययची. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियार यांनी महाराष्ट्राचे जाणता राजा यांच्या बाबत बेताल विधान केले की "जर रामदास गुरू नसता तर शिवाजीला कोणी विचारले नसते" म्हणजे शिवाजी महाराजांना घडवण्यात रामदास यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्राची जनतेला शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते आणि कोणी खोटा इतिहास लिहला हे माहित आहे. सर्व जगाला माहित आहे की शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजामाता यांचा किती मोठा योगदान आहे. महाराजांचा खरा इतिहास महाराजांच्या मावळ्यांनी जनते समोर आणला आहे.तरी देखील जाणूनबुजून महाराजांचा खोटा इतिहास सांगून त्यांचा अपमान राज्यपाल भगतसिंह कोषीयार यांनी केले. तसेच राज्यपालांनी सावित्रीमाई फुले यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य एका कार्यक्रमात केले. राज्यपाल यांनी ज्या प्रकारे सावित्री आई यांचे अपमान केले. त्यावरून असे वाटते की कोषियार यांना खरंच चांगल्या उपचाराची गरज असल्याचे निवेदनाचे पत्र एम आय एम तर्फे भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे..
ज्या प्रकारे राज्यपाल महापुरुषांचे अपमान करत आहे. त्यावरून असे वाटते की त्यांना महाराष्ट्रात दंगल घडून आणायची आहे. किंवा महाराष्ट्रात त्यांची विचारसरणीची सत्ता आली नाही म्हणून असे अपमानजनक वक्तव्य करत असल्याचे आरोप एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. इतक्या महत्त्वाचे पदावर बसून असे वक्तव्य करने म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे.
राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की कायदा जर सर्वांसाठी एकच आहे तर नक्कीच कायद्यात राज्यपाल कोशियार यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद असेल. यावेळी एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचीव जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ,युवा महासचिव इम्रान शेख, युवा कार्याध्यक्ष मोहसीन खान,उपाध्यक्ष तौसीफ शेख,सोशल मिडिया प्रमुख बशीर शेख आदी. उपस्तीती होते.
