प्रगत कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन संपन्न
कलात्मक नजरेतून तयार झालेली कलाकृती उत्कृष्ट ठरते- इंजि.सुरेंद्र धर्माधिकारीनगर - आपल्या सभोवताली असलेल्या परिसराचे कलात्मक व संशोधनातून निरिक्षण केल्यास अनेक कलाकृती निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी हा चौकस असला पाहिजे. इतरांपेक्षा कलाकाराची नजरच वेगळी असते. कलात्मक नजरेतून तयार झालेली कलाकृती उत्कृष्ट ठरत असते. प्रगत कला महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी घेत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे, यातून चांगले कलाकार निर्माण होतील, असा विश्वास इंजिनिअर व छायाचित्रकार सुरेंद्र धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
नगर येथील प्रगत कला महाविद्यालयाच्यावतीने वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री.धर्माधिकारी व प्रथमेश इंडस्ट्रीज चे चिन्मय सुखटणकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य नुरील भोसले, संजय काळे, महावीर सोनटक्के,जाॅयसी शिंद आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात प्राचार्य नुरील भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त विद्यार्थ्यांची कला सर्वांसमोर मांडण्यात येत आहे, त्याचप्रमाणे महाविद्यालयातील माजी प्राचार्यांच्या नावे पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी माजी प्राचार्य रघुनाथ केळकर पुरस्कार - श्रावणी बिज्जा (एटीडी प्रथम), प्राचार्य दत्तात्रय कांबळे पुरस्कार - आशिष कांबळे (एटीडी द्वितीय), प्राचार्य प्रभाकर चव्हाण पुरस्कार - दिनेश ढाळे (फौंडेशन), प्राचार्य घनशाम घोडके पुरस्कार - ऐंजल हिवाळे (अॅनिमेशन), प्राचार्य सुरेश लोंढे पुरस्कार - आरती डोळसे (कमर्शिअल आर्ट) आदि विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या उपक्रमास चेअरमन रा.रेव्ह.बीशप प्रदिप कांबळे, सचिव अॅड.विनायक पंडित, रेव्ह.डॉ.जॉन प्रभाकर आदिंनी शुभेच्छा दिल्या.
प्रगत कला महाविद्यालयाच्यावतीने वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री.धर्माधिकारी व प्रथम इंडस्ट्रीजचे चिन्मय सुखटणकर यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य नुरील भोसले, संजय काळे, महावीर सोनटक्के आदि.

