मुकुंदनगर येथे बालसंगोपन योजनाचा मेळावा संपन्न

मुकुंदनगर येथे बालसंगोपन योजनाचा मेळावा संपन्न
महिला व बालविकास विभाग , बाल कल्याण समिती , बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने


करोनाचा प्रभाव संपत नाही, तोच ओमायक्रॉननने धुमाकूळ घातला. अशावेळी दररोज रूग्णांचे आकडे बदलतात. त्यामुळे विभागाकडे पालक गमावलेल्या मुलांची दररोज नवीन आकडेवारी समोर येत असते. या मुलांना तात्पुरता दिलासा म्हणून राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत 'बालसंगोपन' योजना लागू केली आहे, ही योजना एक पालक , अनाथ,बेघर, निराश्रित व अन्य गरजू बालकांना संस्थेत दाखल करून घेण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास होण्यास संधी उपलब्ध व्हावी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत महिला व बालविकास विभागाने बालसंगोपन योजना सुरू केली. अनाथ, निराधार, परित्यागी बालकांसह दोन्ही पालक असूनही घरात तीव्र कलह आहे, पालकांचा मुत्यू, आजार, कारागृहात आहे आदी विविध कारणांमुळे संगोपनास असमर्थ आहेत अशा कुटुंबातील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. 

अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील आशा कुटुंबातील बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल या उद्देशाने महिला व बालविकास विभाग , बाल कल्याण समिती , बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संगोपन योजनाचे मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते यामध्ये मुकुंदनगर परिसरातील शंभर पेक्षा जास्त प्रमाणात बालसंगोपन प्रस्ताव बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, सदस्य प्रविण मुत्याल, एड. बागेश्री जरीडिंकर यांनी मंजूर करून महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आले आहे. यासाठी मुकुंदनगर मध्ये काम करणारी सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, स्नेहालय संचालित मलाला बालभवन आणि चाईल्ड लाईन च्या टीमने महिनाभरात या परिसरात या योजनेबाबत जनजागृती करून लोकांपर्यंत या बालसंगोपन योजनाची माहिती प्रसारित केली होती, दिनांक 22 मार्च 2022 रोजी दिवसभर या बाल संगोपन योजना मेळावे सुरू होता, 

या कार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागा तर्फे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, कक्षाचे पदाधिकारी सर्जेराव शिरसाठ, प्रकाश वाघ, रुपाली ओव्हल,बाळू साळवे, चाईल्ड लाईनचे केंद्र-समन्वयक महेश सूर्यवंशी, व टीम बालभवनाच्या प्रकल्प व्यवस्थापक शबाना शेख,सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष शहानवाज तांबोळी, तल्हा सय्यद,जाकीर खान, मलाला बालभवन च्या समन्वयक यास्मिन शेख, समिना शेख, मुमताज सय्यद आणि टीमने हा मेळावा संपन्न करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!