गुटखा,सुगंधित तंबाकु साठवणुक करणार्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई गरजेची - डॉ परवेज अशरफी

गुटखा,सुगंधित तंबाकु साठवणुक करणार्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई गरजेची - डॉ परवेज अशरफी

गुटखा आणण्यासाठी कोण मदत करतो?
दिनांक १६.०४.२०२२ रोजी कोतवाली पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्रा मध्ये बंदी असलेल्या गुटखा व सुगंधीत तंबाखू यांचा अंदाजे एक करोड सहा लाख तेवीस हजार सातशे वीस रुपयांचा ( १०६२३७२०/- ) मुद्देमाल जप्त केलेला आहे व गु.र.क्र.१२०/२०२२ अन्वय एफ आय आर दाखल केली. सदरील संपूर्ण कारवाई ही पोलिसांनीच केलेली असुन सदर कारवाई मध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार कारवाई होणे अत्यंत आवश्यक होते. परंतु सदरील अधिनियमाप्रमाणे कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. सदरील कारवाई मध्ये अन्न व औषध प्रशासन , अहमदनगर यांना कळविणे अत्यंत गरजेचे होते परंतु कोतवाली पोलिसांनी कोणत्याही प्रकारची सूचना अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांना दिलेली नाही अशी माहिती माहितीचा अधिकार अर्ज RTI अन्वय अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांचे कडून मिळाली.

सदरील कारवाई मध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार जप्त मुद्देमाल हा अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांच्या ताब्यात देणे तसेच सहायक आयुक्त, अहमदनगर यांचे कार्यालयातील अधिकारी यांना फिर्यादी करणे, थोडक्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ४२ नुसार कारवाई होणे अत्यंत आवश्यक होते परंतु अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ४२ नुसार कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदरील कारवाई मध्ये मोठे आर्थिक व्यवहार झालेले असल्याची शंका निर्माण होत आहे.

सदरील अटक आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे सदरील कारवाई मधील सर्व अटक आरोपी यांना मे. सेशन कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. अश्याप्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारे कायद्याची भीती राहेलेली नाही त्यामुळे आता सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू यांचा शहरात आणि जिल्ह्यात सरास विक्री होत आहे. अश्याप्रकारच्या गुन्ह्यामधील आरोपीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे असे वक्तव्य एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे.

निवेदनाचे पत्र मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सो., अहमदनगर यांना एम आय एम तर्फे देण्यात आले आहे. त्यात पुढे असे म्हंटले आहे की एक करोड रुपयांचे मुद्देमाल फक्त एका छाप्यात जप्त झाले. त्यामुळे या काळ्या धंद्याचा विस्तार किती व्यापक स्वरुपात असेल याचा तपास होणे आवश्यक आहे. या धंद्याशी निगडीत प्रत्येक व्यक्तीने अश्याप्रकारचे गुन्ह्यातून किती बेकायदेशीर संपत्ती जमा केलेली असेल याचा छडा लागणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरील गुन्ह्यामधील आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. करोडो रुपयाचा साठा शहरात येतो. याचाच अर्थ या आरोपींना पूर्ण ताकतीने मदत केली जात असल्याचा आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे.

आरोपींना मोक्का लावणे हाच एक पर्याय राहिला असुन त्यांना मदत करनार्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.असे पत्रकात नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!