मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा फुले यांनी इंग्रज काळात शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व केले
- प्रा.डाॅ.अब्दुस सलाम

नगर - सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी राजवटीत महात्मा ज्योतीराव फुले यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची धग आजही कायम आहे. किंबहुना सद्यस्थितीत शेतकरी आत्महत्यांनी या प्रश्‍नाचे गांभिर्य अधिक वाढविले आहे. महात्मा फुले यांनी इंग्रज काळात शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व केेले होते. ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘गुलामगिरी’ पुस्तकांतून त्यांनी सरकार, नोकरशाही, सामाजिक वर्ग यांचा शेतकर्‍यांप्रती असलेल्या दृष्टीकोनावर प्रखर हल्ला चढविला होता. शेतकर्‍यांना बिनव्याजी पतपुरवठा, करसवलत, सिंचनासाठी व्यवस्था, बाजार व्यवस्थेत संरक्षण, कृषी शिक्षणाची आवश्यकता आदि विषय पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरकार, नोकरशाही, सावकारी आणि बाजार व्यवस्थेत शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्याचे मुद्दे वारंवार उपस्थित केले होते, असे प्रतिपादन मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केले.




मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा,मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, मासुमिया डी.एल.एड्.कॉलेज व मासुमिया बी.एड्. कॉलेज, मुकुंदनगर,अहमदनगर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंत्ती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज हे होते. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अध्यक्षांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सय्यद नौशाद, सदफ शेख, जबीन सय्यद, मुमताज,फरजाना, सुलताना, हिना, यास्मिन व इतर शिक्षिका उपस्थित होते.छात्रशिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ.सलाम सर म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक, समाज हितचिंतक श्रेष्ठ कृतिशिल असे होते. समाजातील विषमता, जाती भेद, वर्ण, द्वेष, गुलाम गिरी या कर्मठ प्रवृत्तीशी त्यांनी लढा दिला. दिनदुबळ्याचा विकास हा शिक्षणा शिवाय होणार नाही. हे त्यांनी ओळखले होते. स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. स्वत:ची पत्नी सावित्रीबाईंना शिकवुन त्यांना शिक्षिका केले. 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. तसेच बाल विवाह, सती प्रथा, भु्रणहत्या या सामाजात रुढ होत्या. या नष्ट करण्यासाठी त्यांनी सामाजाचे प्रबोधन केले. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. जगाला मानवता धर्म सांगितला. मानवाची सेवा व स्वातंत्र्याचे रक्षण हिच खरी ईश्‍वर सेवा आहे.असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन मिनाज शेख यांनी केले. सुत्रसंचालन शकीला दंडोती यांनी केले व आभार शेख असलम पटेल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!