युवक काँग्रेसच्यवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

युवक काँग्रेसच्यवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नगर - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दुर्लक्षित घटकांच्या उत्कर्षासाठी वेचले. वंचितांचे मसिहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श आपण घेऊन समाजात काम केले पाहिजे. त्यांचे विचार कृतीतून आणूण समाजोन्नत्तीचे काम करावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी केले.

अहमदनगर युवक काँग्रेसच्यवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, बाळासाहेब भंडारी, स्वप्नील गायकवाड, नईम सरदार, अक्षय बोरुडे, धिरज शिंदे, सागर शिंदे, स्वप्नील सकट, नादीर शेख, भैय्या करपे, अस्लम इनामदार आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब भंडारी, नईम सरदार आदिंनी मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज सुधारणेच्या विचार मांडले. शेवटी स्वप्नील सकट यांनी आभार मानले.

युवक काँग्रेसच्यवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, बाळासाहेब भंडारी, स्वप्नील गायकवाड, नईम सरदार, अक्षय बोरुडे, धिरज शिंदे, सागर शिंदे, स्वप्नील सकट, नादीर शेख, भैय्या करपे, अस्लम इनामदार आदि.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!