समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने मुळे खरे स्वतंत्र मिळाले- प्रा.डाॅ.सलाम सर
नगर - अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलीत सर सय्यद अहमदखान उर्दू प्राथमिक शाळा,मातोश्री उर्दू हायस्कुल,अलहाज शेख अब्दुल अजीज उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अॅण्ड कॉमर्स,आलमगीर अहमदनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अध्यक्षांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपले विचार व्यक्त केले. "भारतीय समाजाला आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने मुळे खरे स्वतंत्र मिळाले. व प्रत्येक नागरिक खुशाल आहे" असे विचार प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन मुबीना फजल यांनी केले. सुत्रसंचालन एजाज सर यांनी केले व आभार खान निशात यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सय्यद अफसाना, मुख्याध्यापक शेख जमीर अहमद,शेख अंजुम, तांबोळी नसरीन,शेख सफिया व इतर शिक्षिका उपस्थित होते.

