प्रगत कला महाविद्यालयात विकास कांबळे यांचे शिल्पकला प्रात्यक्षिक संपन्न

प्रगत कला महाविद्यालयात विकास कांबळे यांचे

शिल्पकला प्रात्यक्षिक संपन्न


नगर - प्रगत कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध कलात्मक व नाविन्यपुर्वक प्रात्यक्षिके व चर्चा आयोजित करण्यात येतात. विकास प्रकाश कांबळे या प्रसिद्ध शिल्पकाराचे प्रात्यक्षिक यावेळी आयोजित करण्यात आले होते. विकास कांबळे यांना द बाॅम्बे आर्ट सोसायटीचे उत्कृष्ट शिल्पकलेचे पारितोषिक असून, ते प्रसिद्ध शिल्पकार म्हणून नगरमध्ये कार्यरत आहेत. या शिल्पकलेच्या प्रात्यक्षिकांसाठी मॉडेल म्हणून लाभले, डीवायएसपी अहमदनगर ग्रामीण अजित पाटील या व्यक्ती शिल्पामध्ये चेहर्‍यावरील हावभाव व ठेवण उत्कृष्टरित्या शिल्पकाराने मातीमध्ये उतरवली आहे. या प्रात्यक्षिकांसाठी आयकॉन पब्लिक स्कूल येथील कलाशिक्षक व माजी विधार्थी भारत पवार हे कला विषयामध्ये आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना स्पॉट व्हिजिट अंतर्गत घेऊन आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाचा आनंद घेतला. प्रात्यक्षिकांनंतर शिल्पकार विकास कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शंकांचे निरसन करुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. धातूचे ओतील काम, मोल्ड, माती काम व कोरण्याबाबत सांगितले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित सेंट सेव्हिअर्स चर्च, तारकपुर येथील प्रिस्ट इन चार्ज रेव्ह. सतिष तोरणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले. यावेळी कार्यक्रमास प्राचार्य नुरील भोसले, प्रा.संजय काळे, प्रा.महावीर सोनटक्के, दिनेश अष्टेकर, चंद्रकांत देठे, नासिक डायोसिसन कौन्सिल चे अध्यक्ष रा. रेव्ह.डॉ.प्रदीप कांबळे, सचिव अ‍ॅड.विनायक पंडित यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!