युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी पै.मोसिम शेख यांची निवड
नगर - युवक काँग्रेसचे निवडणुकीत पै.मोसिम शेख यांची अहमदनगर युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवडून आले. राज्यभरातील युवक काँग्रेस पदाधिकार्यांचे निवडीसाठी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत पै.मोसिम शेख यांना 1513 इतकी विक्रमी मते घेऊन युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली. 22 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 21 दरम्यान झालेल्या या निवडणुकीत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पै.मोसिम शेख यांच्यासाठी प्रदेश सचिव हेमंत ओगले यांनी भरपूर प्रयत्न केले.निवडीनंतर पै.मोसिम शेख म्हणाले, काँग्रेस पक्ष देशपातळीवर काम करत तळागाळापर्यंत पोहचलेला आहे. पक्षाचे चांगले काम करणार्यांना लोकशाही पद्धतीने निवडणुकीद्वारे पद मिळत असल्याने चांगले कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. आपली निवड ही कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने झाली असल्याने यापुढे जिल्ह्यात युवका काँग्रेस काम मोठ्या प्रमाणात वाढविण्यास आपले प्राधान्य राहील, असे सांगितले. या निवडीबद्दल मोसिम शेख यांच्यासह नूतन पदाधिकार्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

