नगोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या विश्वस्तांवर हल्ला करणार्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नगर - 21 जानेवारी 2022 रोजी कोंड्या मामा चौक, मंगलगेट येथे इकराम तांबटकर, इमरान शेख, युनुस तांबटकर यांच्या ट्रस्ट च्या जमिनीच्या वाद निर्माण झाले होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन प्राण घताक हल्ला झाला, यात फिर्यादी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यातील आरोपी यासर निसार शेख, यासीन निसार शेख, माजीद इकबाल शेख, अरफात एकबाल शेख पवार, कामरान कलीम शेख, नबिल अब्दुल चाऊस व इतर सात आठ इसम यांच्या विरोधात रीतसर तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर आरोपींनी अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला होता, परंतु दि.3 मार्च 2022 रोजी कोर्टाने या आरोपींचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे. यापुर्वीही इमरान शफी शेख यांच्यावर सारडा कॅन्टीन येथे हल्ला करून ज़खमी केले होते. असे असताना दिनाकं 20 फेबुवार 2022 रोजी सुपा जवळ पुन्हा हल्ला करण्यात आला. फिर्यादीतर्फे सरकारी वकील अॅड. पवार, अॅड. सौरभ काकडे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अॅड.एस.एस.गुगळे यांनी काम पाहिले. पुढील तपास तोपखाना पोलिस करीत आहेत.
