'अल-करम'च्या मोफत मोतीबिंदू
शस्त्रक्रिया शिबीरास रुग्णांचा प्रतिसाद
मोफत शिबीर हा रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे : तांबोळी- अल-करम हॉस्पिटलच्यावतीने व बुधरानी हॉस्पिटच्या सहकार्याने स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तौफिक तांबोळी, समीर सय्यद, शेरअली शेख, शहानवाज तांबोळी, आबीद दुलेखान, माया अल्हाट आदि.
अहमदनगर - आज आरोग्य सेवा महाग होत चालली आहे, गरीब रुग्णांना उपचार घेणेही परवडत नसल्याने उपचार घेण्याबाबत टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत मोफत शिबीरांचा त्यांना मोठा आधार वाटतो. त्यामुळे अशा मोफत आरोग्य शिबीर वारंवार होणे गरजेचे आहे. अल-करम हॉस्पिटल नेहमीच मोफत आरोग्य सेवा देत गरजू रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करत आहे. हॉस्पिटलच्या या उपक्रमात इतर सामाजिक संस्थांनीही सहभागी होत मोफत शिबीराच्या माध्यमातून गरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन तौफिक तांबोळी यांनी केले.
अल-करम सोसायटीच्या अल-करम हॉस्पिटलच्यावतीने व बुधरानी हॉस्पिटच्या सहकार्याने स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त दाळमंडई येथील मिरगर डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तौफिक तांबोळी, समीर सय्यद, शेरअली शेख, शहानवाज तांबोळी, आबीद दुलेखान, माया अल्हाट, मुन्ना कुरैशी,आवेस कुरैशी आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात समीर सय्यद यांनी हॉस्पिटलच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या शिबीरात माया अल्हाट यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. यामध्ये 93 रुग्णांची नेत्र तपासणी तर 15 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी तर शेरअली शेख यांनी आभार मानले.

