‘द व्हॉइस ऑफ ए लेजेन्ड किशोर कुमार’ कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
गोल्डन मोमेंटस् फौंडेशनच्या‘द व्हॉइस ऑफ ए लेजेन्ड किशोर कुमार’ या मैफिली प्रसंगी हरीश हरवानी, सईद खान, आयोजक व गायक अविनाश कांबळे, डॉ. रिजवान शेख, देव पाऊलबुद्धे, संगीत संयोजक व गायक वाजीद खान, रवींद्र बक्षी, जनक आहुजा, कुबेर पतके, डॉ. इम्रान शेख, अॅड. संतोष गायकवाड, सौ. संध्या मेढे, युनूस तांबटकर, संजय कांबळे आदि.
अहमदनगर - येथील ऑर्केस्ट्रा कादंबरी निर्मित गोल्डन मोमेंटस् फौंडेशनच्यावतीने सावेडीतील माऊली सभागृहात ‘द व्हॉइस ऑफ ए लेजेन्ड किशोर कुमार’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गायकांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गीतांचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास हरीश हरवानी, सईद खान, आयोजक व गायक अविनाश कांबळे, डॉ. रिजवान शेख, देव पाऊलबुद्धे, संगीत संयोजक व गायक वाजीद खान, रवींद्र बक्षी, जनक आहुजा, कुबेर पतके, डॉ. इम्रान शेख, अॅड. संतोष गायकवाड, सौ. संध्या मेढे, युनूस तांबटकर, संजय कांबळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी रविन्द्र बक्षी म्हणाले, नगरमध्येही अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांना व्यासपीठ मिळाल्यास त्यांची कला सर्वांसमोर येते. हेच काम गोल्डन मोमेंटस् फौंडेशन करत आहे. त्यामुळे अनेक कलाकारामधील हुनर सर्वांना दिसून येत आहे. किशोर कुमार हे महान गायक होते, त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही सर्वांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या कार्यक्रमानिमित्त नगरच्या गायकांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन होणे हे गायक, वादक, कलाकारांबरोबरच रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी ठरेल, असे सांगितले.
गायक वाजीद खान, अविनाश कांबळे, देवदत्त पाऊलबुद्धे, संदीप भुसे, जुबेर शेख, प्रीती गाडेकर(पवार), रोहिणी दिवटे, प्रणाली यांनी गायलेल्या गीतांचे संगीत संयोजक संजय, गौतम, दिलावर यांनी केले तर वादक दिलावर शेख, गौतम गुजर, संजय आठवले, अमित बरूआ, सतिश इंगळे, अंबरीश जहागीरदार, फरहान शेख, श्रीकांत गडकरी, विशाल बोर्डे, ललित भूमकर, अमित साळवे, विनोद पंडित यांनी त्यांना साथ दिली.

