जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर  : जिल्ह्यात काही दिवसांत अशांतता झाल्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबं
धात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक २९ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

या आदेशानुसार खलील बाबींना मनाई

करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे :-

दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, शस्त्रे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल अशी, व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व त्यासंदर्भात आवेशपूर्ण भाषणे करणे, संवेदनशील वक्तव्य करणे, अथवा मत प्रदर्शित करणे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!