मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत
‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा
डॉ.अब्दुल कलाम यांनी देशाची प्रतिमा उंचविण्याचे काम केले - डॉ.प्रा.सलाम सर
अहमदनगर, (प्रतिनिधी) - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर वैज्ञानिक क्षेत्रात मोठी क्रांती केली, भारताला संरक्षणदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. राष्ट्रपतीच्या माध्यमातून त्यांनी जगात देशाची प्रतिमा उंचविण्याचे काम केले. विद्यार्थी व छात्र शिक्षकांनी त्यांच्या जीवनापासून व केलेल्या कार्यापासुन प्रेरणा व स्फुर्ती घ्यावी, असे मत डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी व्यक्त केले.
मुकुंदनगर येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्,कॉमर्स् अॅेण्ड सायन्स् फॉर गर्ल्स्,मासुमिया डी.एल.एड्.कॉलेज (उर्दु) वाबळे कॉलनीमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंत्ती ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज (सर) यांनी पुष्पमाला अर्पण केली. यावेळी मुख्याध्यापक नौशाद सय्यद, फरहाना सय्यद आदि उपस्थित होते.शिक्षकांनी व विद्यार्थीनींनी पुस्तकांचे वाचन केले. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थीनींनी व छात्र शिक्षकांनी आपआपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी फरीदा जागिरदार, नाजेमा शेख, शहेनाज शेख,मतीन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन बहार अंजुम यांनी केले तर तलमीज सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

