मखदुम सोसायटी व मराठा सेवासंघ तर्फे जि.प. आलमगीर उर्दू शाळेत मोफत वह्या वाटप

शासकीय शाळांकडे समाजाचा पहाण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे : शरफुद्दीन सर

makhdum, marathasevasangh, aalamgir, urduschool, school, notebookfree


खासगी व शासकीय शाळांमध्ये आज स्पर्धा -

अहमदनगर - खासगी व शासकीय शाळांमध्ये आज स्पर्धा राहिलेलीच नाही.समाजामधील उच्च व मध्यमर्गीय पालक खासगी शाळेतच आपल्या मुलांना शिक्षण देत आहे. या उच्च व मध्यमवर्गीयांमध्येच खासगी शाळेत प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे व त्यामुळे खासगी संस्थेवाले पालकांकडून मोठमोठे डोनेशन घेऊन प्रवेश देत आहेत हे आज उघड झालेले असून, या पालकांचे शासकीय शाळेबद्दल असलेले गैरसमाज दूर करण्याची व त्यांचा दृष्टीकोन बदलण्याची आवशकता असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शेख शरफुद्दीन सर यांनी केले.

    दानशूरांच्या सहकार्याने -

    मखदुम सोसायटी, रहेमत सुलतान फाऊंडेशन व मराठा सेवा संघाच्यावतीने व दानशूरांच्या सहकार्याने आलमगीर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शेख शरफुद्दीन सर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हे खान, मुख्याध्यापीका शेख नसरीन बानो ज़हुरूददीन, शेख जाकेरा नासीर, शेख शगूफता अंजुम अ.समद, सय्यद साजिरा असगर,सय्यद रफअत हूसेन,शेख शिरीन पिर मोहम्मद आदि उपस्थित होते.

    शरफुद्दीन सर म्हणाले -


    समाजातील वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासकीयस्तरावर प्रयत्न होत आहेच परंतु आपणही त्यात सहभागी होवून मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे. त्यांच्या गरजा पूर्ण करुन त्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण केली पाहिजे. तेव्हाच ते एक सक्षम नागरिक बनतील.छोट-छोट्या गोष्टीसाठी शासनावर अवलंबून न राहता समाजातील सक्षम लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. प्रास्तविक शेख नसरीन यांनी केले तर आभार शेख शगूफता यांनी मानले.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    #buttons=(Ok, Go it!) #days=(20)

    Our website uses cookies to enhance your experience. Learn More
    Ok, Go it!